तानाजी सावंत यांची जिल्हा संपर्कप्रमुख पदावरून गच्छंती?

 शिवसेनेचे माजी मंत्री आणि आमदार तानाजी सावंत यांची जिल्हा संपर्कप्रमुख पदावरुन गच्छंती होण्याची शक्यता आहे. 

Updated: Jan 11, 2020, 03:49 PM IST
तानाजी सावंत यांची जिल्हा संपर्कप्रमुख पदावरून गच्छंती? title=
संग्रहित छाया

मुंबई : शिवसेनेचे माजी मंत्री आणि आमदार तानाजी सावंत यांची जिल्हा संपर्कप्रमुख पदावरुन गच्छंती होण्याची शक्यता आहे. तसे संकेत मातोश्रीवर झालेल्या बैठकीत देण्यात आले आहे. तानाजी सावंत यांनी नेमलेल्या पदाधिकाऱ्यांची थेट हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्यावरही कारवाईची टागंती तलावार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सावंत यांनी नेमलेल्या पदाधिकाऱ्यांनी हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

'सावंत यांची शिवसेनेतून हकालपट्टी करा'

दरम्यान, पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांवर कारवाई हाेईल, पण आज तानाजी सावंत यांच्यावरील कारवाईचा विषय झालेला नाही.  त्यांच्यावर कारवाई करावी, अशी कुणीही मागणी केलेली नाही. लवकरच साेलापूर आणि उस्मानाबाद या दाेन्ही जिल्ह्याचे नवे पदाधिकारी नेमले जातील. पण दुसरीकडे शिवसेना सचिव आणि खासदार विनायक राऊत यांनी कारवाईचे संकेत दिले नाहीत, असे म्हटले आहे.

पक्षविरोधी कारवाई केल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे नाराज आहेत. त्यामुळे आमदार तानाजी सावंत यांची जिल्हा संपर्कप्रमुख पदावरून गच्छंती होण्याची शक्यता. त्यांच्यावक कडक कारवाई हाेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. दरम्यान, पुरुषोत्तम बर्डे यांनी माहिती दिली की, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेतला आहे की, तानाजी सावंत यांनी नेमलेल्या पदाधिकाऱ्यांची थेट हकालपट्टी करण्यात आलीय. सावंतसेना ते चालवत हाेते. उद्धव साहेब बाेलणार नाहीत, ते कृतीतून कारवाई दाखवतात.उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात खोट्या बातम्या त्यांनी पसरवल्या. गेल्या पाच वर्षांत त्यांना शिवसेनेने खूप दिले आहे. तरीही त्यांनी  पक्षविरोधी भूमिका घेतली. त्यांच्या हकालपट्टीची मागणी केलेली आहे.