विरारमध्ये भरलीय 'प्रतिकात्मक प्राण्याची जत्रा'

बातमी बच्चे कंपनीसाठी... बच्चे कंपनीला धमाल मस्ती आणि प्राणी पाहायचे असतील तर विरारमध्ये सुरू असलेल्या प्रतिकात्मक प्राण्यांच्या जत्रेला जरूर भेट द्या... या जत्रेत जंगलात जाऊन प्राणी पाहण्याचा अनुभव येतोय.

Updated: Feb 15, 2018, 05:58 PM IST
विरारमध्ये भरलीय 'प्रतिकात्मक प्राण्याची जत्रा'  title=

प्रविण नलावडे, झी मीडिया, विरार : बातमी बच्चे कंपनीसाठी... बच्चे कंपनीला धमाल मस्ती आणि प्राणी पाहायचे असतील तर विरारमध्ये सुरू असलेल्या प्रतिकात्मक प्राण्यांच्या जत्रेला जरूर भेट द्या... या जत्रेत जंगलात जाऊन प्राणी पाहण्याचा अनुभव येतोय.

विरार पश्चिमेला असलेल्या विवा मलांज या मैदानावर सध्या बच्चे कंपनीची मोठी गर्दी पाहायला मिळतेय. त्यांच्यासोबत त्यांच्या पालकांची लगबग सुरू आहे. कारण विवा मलांज मैदानावर 'प्रतिकात्मक प्राण्याची जत्रा' भरलीय. 

आतमध्ये जाताच एका नैसर्गिक जंगलात आलोत की काय असा भास होतो. हत्ती, काळा घोडा, कांगारू, सिंह, गोरिला, संगरित गाय-वासरू, गेंडा, डायनासोर, उंट, वाघ अशा विविध प्राण्याचं दर्शन या प्राण्यांच्या जत्रेत होतं. 

प्रत्येक प्राणी जरी प्रतिकात्मक स्टॅच्युसारखा वाटत असला तरी त्याच्यासमोर उभं राहताच हालचाली करण्यास सुरूवात करतात आणि प्राणी बघताना त्यातला जिवंतपणा अनुभवायाला मिळतो. ही प्रतिकात्मक प्राण्याची जत्रा १९ मार्चपर्यंत सुरू असणार आहे. या मेळ्यात जातानाच सुरूवातीला अमेरिकेच्या व्हाईट हाऊसचं प्रत्येकाला दर्शन होतं.  

पर्यावरणाच्या ऱ्हासासोबत जंगलातील वन्य प्राणीही आता नष्ट होत आहेत. उद्याच्या पिढीला जंगलातील प्राणी केवळ पुस्तकातच पाहायला मिळताहेत. मात्र, या प्रतिकात्मक प्राण्यांच्या जत्रेत भेट दिल्यानंतर खरंच जंगल सफर केल्याचा अनुभव मिळतोय.