VIDEO : ठाकरे घेणार पवारांची मुलाखत, काय म्हणतायत सुप्रिया सुळे

उद्या महाराष्ट्राच्या राजकारणात एक अनोखी प्रकट मुलाखत रंगणार आहे. ज्यांची मुलाखत आहे, ते एका राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष आहेत... तर मुलाखत घेणारेही दुसऱ्या एका राजकीय पक्षाचे अध्यक्ष आहेत...

Updated: Feb 20, 2018, 09:12 PM IST
VIDEO : ठाकरे घेणार पवारांची मुलाखत, काय म्हणतायत सुप्रिया सुळे  title=

मुंबई : उद्या महाराष्ट्राच्या राजकारणात एक अनोखी प्रकट मुलाखत रंगणार आहे. ज्यांची मुलाखत आहे, ते एका राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष आहेत... तर मुलाखत घेणारेही दुसऱ्या एका राजकीय पक्षाचे अध्यक्ष आहेत...

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बुधवारी मुलाखत घेणार आहेत. यावरच बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आणि शरद पवारांच्या कन्या सुप्रीया सुळे यांनी ठाकरे आणि पवार कुटुंबीयांचे फार जुने संबंध असल्याचं सांगितलं. 

तसंच राजकारणात विरोध नैतिकतेचा असतो वैयक्तिक कधीच नसतो, अशी प्रतिक्रियाही सुप्रिया यांनी यावेळी व्यक्त केली. 

या ठाकरे आणि पवार एकाच मंचावर दिसणार असल्यानं लोकांची उत्सुकता नक्कीच वाढलीय... तसंच या मुलाखतीमुळं राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावणार, एवढं नक्की...