कोरोनाच्या संकटात गुंतागुंतीची दुर्मिळ शस्त्रक्रिया करून ८ दिवसांच्या बाळाला जीवनदान

 मुंबईतील वाडिया हॉस्पीटलमध्ये केले उपचार 

Updated: Jul 3, 2020, 02:37 PM IST
कोरोनाच्या संकटात गुंतागुंतीची दुर्मिळ शस्त्रक्रिया करून ८ दिवसांच्या बाळाला जीवनदान title=

मुंबई : जगभरात दुर्मिळ –हृदयदोषकोरोनाचे संकट पसरले असून या काळात जन्मलेल्या बाळांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. अहमदनगर येथे जन्मलेल्या बाळाला आठवड्याभरातच श्वास घेण्यात अडथळे येऊ लागल्याने पालकांनी बाळाच्या उपचाराकरिता मुंबईतील बाई जेरबाई वाडिया हॉस्पीटल गाठले. बाळामध्ये असलेला दुर्मिळ हदयदोष दुर करण्यासाठी वाडिया हॉस्पीटलमधील डॉक्टरांनी बलून एओर्टिक वाल्वोटॉमी ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया केली. ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली असून बाळाला नव्याने जीवनदान मिळाले.

अहमदनगर येथे राहणा-या जोडप्याला घरी बाळाचे आगमन झाल्याचा प्रचंड आनंद झाला होता. बाळाचे वजनही निरोगी बाळाप्रमाणेच २.५ किलो इतके होते. तसेच कोरोना सारख्या संकटकाळी देखील बाळ सुखरुप जन्माला आल्याने संपुर्ण कुटुंब खुश होते. मात्र जन्मानंतर आठवड्याभरातच बाळाला स्तनपानावेळी श्वासोच्छवासात अडचणी येऊ लागल्या. बाळाच्या पालकांनी त्वरित जवळील बालरोगतज्ञांची भेट घेतली. त्यावेळी इकोकार्डियाग्राफी तपासणी दरम्यान बाळाच्या श्वासाचा वेग वाढणे तसेच –हदयदोष आढळून आला. तसेच बाळाच्या महाधमनीत ब्लॉकेज दिसून आले. बाळाच्या पालकांनी त्याला त्वरीत रुग्णवाहिकेने मुंबईच्या दिशेने धाव घेत बाई जेरबाई वाडिया हॉस्पीटलमध्ये पुढील उपचारासाठी दाखल केले. बाळाचा हार्ट पंपिंग रेट १५ ट्क्के इतका कमी असून सर्वसामान्यांमध्ये तो कमीतकमी ५५ टक्के इतका असतो.

येथील डॉक्टरांनी सांगितले की बाळाची प्रकृती खालावली होती. बालरोग कार्डियक एनेस्थेटिस्ट, इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट, नर्सिंग आणि तांत्रिक टीमसह कार्डियाक टीमने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरेक्षेविषयी आवश्यक ती सारी खबरदारी घेत बाळाच्या शस्त्रक्रियेकरिता सज्ज झाले होते. चार विविध थरांनी सुरक्षित असे पीपीई किटचा वापर शस्त्रक्रियेवेळी करण्यात आला. बाळाला त्वरित आयसोलेशन युनिटमध्ये दाखल केले आणि श्वासोच्छवासाच्या तीव्र अडचणी लक्षात घेता व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले.

हा जन्मजात दोष एकूण लोकसंख्येच्या 2% बाळांमध्ये दिसून येते, त्यापैकी 15-20% -हदयाच्या झडपा ब्लोकेज, तर  25% बाळांमध्ये जन्माच्या 1 महिन्यानंतर ही स्थिती पहायला मिळते.. कोविड -१९ च्या चाचणीसाठी बाळ आणि आईची स्वॅब टेस्ट करण्यात आली. बाळाची प्रकती पाहता पाहता हार्ट वाल्व उघडण्यासाठी त्वरीत शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. शल्यक्रिया करण्यास उशीर केल्याने कदाचित त्याचे आयुष्यही धोक्यात येऊ शकते. म्हणूनच बाळाला पुढील प्रक्रियेसाठी कार्डियाक कॅथेटरिझेशन प्रयोगशाळेत हलविण्यात आले.

बाळाची शस्त्रक्रिया करण्यात आली असून बलून एओर्टिक वाल्वोटॉमी किंवा बलून एओर्टिक व्हॅल्व्हुलोप्लास्टीमध्ये डिफिलेटेड बलूनसह कॅथेटरचा वापर करून ह्रदयाचा कॅथेटरिझेशनद्वारे शस्त्रक्रिया केली जाते. कॅथेटर रक्तवाहिनीत घातला जातो. हे अरुंद व्हॉल्वमध्ये हलविले जाते आणि ह्रदयाच्या झडप उघडण्यासाठी फुगा फुगविला जातो. ही जोखमीची शस्त्रक्रिया 2 तास चालली. त्यानंतर इकोकार्डिओग्राफीने हृदय पंपिंग क्षमतेत त्वरित लक्षणीय सुधारणा दर्शविली. बाळाची कोविड चाचणी नकारात्मक होती. तथापि, आईची सकारात्मक चाचणी झाली आणि तिला आयसोलेशनच्या कारणास्तव कस्तुरबा रुग्णालयात हलवावे लागले. त्यानंतर बाळाला अतिदक्षता विभागात हलविण्यात आले. बाळाला लवकरच घरी सोडण्यात येईल.

बाळाचे वडिल सांगतात , कोरोनाच्या भितीमुळे आम्ही खूपच घाबरलो होतो. परंतु, आम्ही खात्री करुन घेतली तसेच आवश्यक ती सर्व काळजी घेत आहोत. आमच्या पहिल्या बाळाच्या जन्मानंतर आम्हाला आनंद झाला. जेव्हा त्याला हृदय दोष असल्याचे निदान झाले तेव्हा मात्र आम्हाला मोठा धक्का बसला. वाडिया हॉस्पीटलमध्ये वेळेवर व तातडीने उपचार मिळाला नसता तर आम्ही आमच्या बाळाला गमावले असते. आमच्या बाळाला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी केलेल्या सुरक्षितता उपाय आणि प्रयत्नांची आम्ही प्रशंसा करतो. त्यांच्याबरोबर घरी परत जाण्यासाठी मी खूप उत्साही आहे.

वाडिया ग्रुप ऑफ हॉस्पिटलच्या सीईओ डॉ. मिनी बोधनवाला सांगतात, वाडिया रूग्णालयात आम्ही कोविड संसर्ग झालेल्या मुलांबरोबरच इतर गंभीर दोष असलेल्या मुलांच्या उपचाराकरिता आम्ही विशेष खबरदारी घेत आहोत. यशस्वी उपरांच्या माध्यमातून आमचे डॉक्टर, परिचारिका आणि तंत्रज्ञांच्या टीमची क्षमता आणि आरोग्य सेवा पुरविण्यातील उत्कृष्टता दिसून येते.