मुंबई: इंधन दरवाढ आणि महागाईने होरपळलेल्या सामान्यांना पुन्हा नव्या दरवाढीचा सामना करावा लागणार आहे. पेट्रोलियम कंपन्यानी १ जुलैपासून म्हणजेच आजपासून अनुदानित गॅसच्या दरात २.७१ आणि विनाअनुदानीत गॅसच्या दरात ५५.५० रुपयांची वाढ केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात रुपया घसरल्याने जीएसटीच्या परिणामामुळे गॅस दरात वाढ झाल्याची माहीती पेट्रोलियम कंपनीच्या सूत्रानी दिलीय.
दरम्यान, लाल किल्ल्यावरून गॅस सबसिडी सोडण्याचं आवाहन केल्यावर सव्वाशे कोटी कुटुंबांनी सबसिडी सोडल्याचा अजब दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणात केला आहे. दिल्लीत एम्सच्या चार नव्या प्रकल्पांचं उद्घाटन मोदींच्या हस्ते नुकतंच झालं. त्यावेळी केलेल्या भाषणात मोदी बोलत होते. सव्वाशे कोटी लोकसंख्या असलेल्या देशात सव्वाशे कोटी कुटुंबं असतीलच कशी, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. बोलण्याच्या ओघात अनावधानं हा उल्लेख झाला असण्याची शक्यता असली तरी मोदींच्या या विधानामुळं विरोधकांना आयतं कोलित मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, अच्छे दिनचे स्वप्न दाखवत सत्तेत आलेल्या भाजप सरकारकडून अद्यापही अश्वासनांची पूर्तता नाही. त्यामुळे जनतेला मात्र अच्छे दिनची प्रतिक्षा आहे.