Girls Hostel: मुंबईतल्या घटनेनंतर सरकारचा मोठा निर्णय, मुलींच्या वसतीगृहात आता महिला सुरक्षारक्षक आणि...

state government big decision the girls hostel now has women security guards gr

गणेश कवाडे | Updated: Jul 1, 2023, 11:13 PM IST
Girls Hostel: मुंबईतल्या घटनेनंतर सरकारचा मोठा निर्णय, मुलींच्या वसतीगृहात आता महिला सुरक्षारक्षक आणि...  title=

मुंबई : मुंबईतील मरीन लाइन्स परिसरात असलेल्या सावित्रीबाई फुले वसतिगृहातील (Savitribai Phule Girl Hostel) 19 वर्षीय तरुणीवर बलात्कार (Rape) करुन तिची हत्या केल्याची घटना घडली होती. या घटनेने देशभरात संतापाचे वातावरण निर्माण झालं. या घटनेत संशयित असलेल्या हॉस्टेलच्या सुरक्षारक्षकाने (Security Guard) रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली. या घटनेनं मुलींच्या वसतीगृहातील सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उभं झालं. याबाबत आता राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. 

सूत्रांनी दिलेल्य माहितीनुसार राज्यातल्या मुलींच्या सर्व वसीतगृहात आता प्रशिक्षित महिला सुरक्षा रक्षकांची (Women Security Guard) नेमणूक केली जाणार आहे. याबरोबरच वसतीगृहात राहाणाऱ्या मुलींच्या लॉण्ड्री आणि इतर सेवांसाठीही महिला नियुक्त केल्या जाणार आहे. वसतीगृहात येणाऱ्या-जाणाऱ्या मुलींचा कॉम्प्युटरमध्ये रेकॉर्ड (Computer Record) ठेवला जाणार आहे. यासंदर्भात उच्च आणि तंत्र शिक्षण विभागातर्फे राज्य सरकारच्या (State Government) सर्व गर्ल्स हॉस्टेलसाठी नियमावली जाहीर केली जाणार आहे. 

मुंबईतल्या मरिन लाईन्स इथल्या सावित्रीबाई फुले सरकारी वसतीगृहातील विद्यार्थिनीवर बलात्कार आणि हत्या प्रकणानंतर राज्य सरकारने कठोर पावलं उचलण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उच्च आणि तंत्र शिक्षण विभागातर्फे एक नियमावली तयार करण्यात आली आहे. राज्यातील मुलींच्या वसतीगृहाच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी एक समिती नियुक्त करण्यात आली होती. या समितीने सुरक्षेसंदर्भात करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेत अहवाल सादर केला. या अहवालातील शिफारशींना मंजूरी देण्याचा निर्णय उच्च आणि तंत्रज्ञान विभागाने घेतला आहे. 

विशाखा समिती, अॅटि रँगिंग कमिटी
मुलींच्या सर्व वसती गृहात विशाखा समिती, अँटी रँगिंग कमिटी आणि तक्रार पेटी असणं अनिवार्य केलं जाणार आहे. याशिवाय तात्काळ संपर्क साधण्यासाठी ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबर सर्व वसतीगृहाच्या परिसरात लावण्यात यावेत असे निर्देशही देण्यात येणार आहेत. विद्यार्थिनींचा सुरक्षेसाटी सुरक्षा समिती गठित करावी अशा सूचना प्रस्तावित आहेत. उच्च आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख या समितीचे अध्यक्ष असतील. 

प्रशिक्षण शिबिराचं आयोजन
वसतीगृहातील हाऊसकीपर, अधीक्षक वॉर्डन यांच्यासाठी विद्यार्थिनींची सुरक्षा आणि आरोग्यसंदर्भात प्रशिक्षण शिबिर आयोजित केलं जाणार आहे. वसतीगृहाची कंपाऊंड वॉल मजबूत असावी, वसतीगृह परिसर आणि गॅलरीत सीसीटीव्ही लावण्यात यावेत. विविध कामांसाठी विद्यापीठात येणाऱ्या लोकांसाठी ठराविक वेळ निश्चित करण्यात यावी, सुरक्षा रक्षक केवळ होम गार्ड आणि गृह विभागद्वारा प्रमाणित सेवा देणाऱ्या संस्थाचे असावेत. ठराविक कालावधीनंर सुरक्षा रक्षकांची बदली करण्यात यावी. एकही सुरक्षा रक्षक कायमस्वरुपी नसावा. प्रत्येक मजल्यावर आपातकालिन अलार्म बटन असावं, तसंच विद्यार्थिनींच्या उपस्थितीबोबत वेळोवेळी रिपोर्ट दिला जावा असे महत्त्वाचे निर्णय या नियमावलीत घेण्यात आले आहेत.