मुंबई : शिवसेनेचे मंत्री आणि राज्याचे वनमंत्री संजय राठोड मुख्यमंत्र्याचं निवासस्थान वर्षावर गेले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी संजय राठोड हे वर्षावर गेले असल्याचं सांगण्यात येत आहे. पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संजय राठोड यांच्यावर विरोधकांनी सतत टीका सुरु ठेवली आहे. यानंतर संजय राठोड हे अडचणीत आले आहेत.
संजय राठोड यांनी मंगळवारी यवतमाळमधील दिग्रसमध्ये शक्तिप्रदर्शन केलं होतं, यानंतर विरोधकांनी संजय राठोड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी अधिक तीव्रतेने लावून धरली होती.
तब्बल १५ दिवसानंतर संजय राठोड हे जनतेसमोर आले ते देखील यवतमाळमधील दिग्रसच्या पोहरादेवी मंदिराजवळ. यानंतर आज संजय राठोड हे मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित होते.
शरद पवार यांनी देखील संजय राठोड यांच्या शक्तिप्रदर्शनावर तीव्र नापसंती व्यक्त केली होती, यानंतर शिवसेनेचे खासदार आणि नेते संजय राऊत यांनी देखील कितीही जवळचा व्यक्ती असला तरी उद्धव ठाकरे यांना नियम मोडलेले आवडत नाहीत, असं म्हटलं होतं.