आझाद मैदानातील आंदोलक एसटी कर्मचारी आक्रमक, विलीनीकरणावर ठाम

ST Employee strike : एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबाबतची बातमी.एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत.  

Updated: Apr 4, 2022, 08:19 AM IST
आझाद मैदानातील आंदोलक एसटी कर्मचारी आक्रमक, विलीनीकरणावर ठाम title=

मुंबई : ST Employee strike : एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबाबतची बातमी.एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. मुंबई महापालिकेबाहेर एसटी कर्मचारी घोषणाबाजी करत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांची राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरु आहे. राज्य सरकारमध्ये विलीनीकरण झालेच पाहिजे, यावर कर्मचारी ठाम आहेत.

आमच्या मागण्या पूर्ण करा, अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांची केली आहे. या आंदोलनात महिला कर्मचारीही सहभागी झाल्या आहेत. कर्मचाऱ्याचे आंदोलन सुरु असताना आझाद मैदानात मूलभूत सुविधा मिळत नसल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. अंघोळ, शौचालयाची गैरसोय होत असल्याने आंदोलन सुरु आहे.

गेल्या चार ते पाच महिन्यांपासून एसटीचे राज्यशासनात विलीनीकरण व्हावे यासाठी एसटी कर्मचाऱ्यांचे आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे. मात्र, आमच्या आंदोलनाची दखल घेतली जात नाही. राज्य सरकारमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचे विलीनीकरण करा, आम्ही आमच्या मागणीवर ठाम आहोत, असे आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.