प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई : आज आझाद मैदानात आलेल्या मोर्चेकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी गेल्या सहा दिवसात जे सोसलंय...याची कल्पना त्यांच्या पायांकडे बघून येते..
नाशिक जिल्ह्यात डोंगराळ भागात... वनात चालताना काटे कुटे लागून हे पाय नेहमीचं रक्तानं माखतात...पण आज झालेल्या जखमा वेगळ्या आहेत...तळपत्या सूर्याची तमा न बाळगता गेले सहा दिवस सखुबाई वागले डांबरी रस्त्यावरून चालतायात. सखुबाईंच्या घरातल्या तीन पिढ्या वनजमिनीवर शेती करताय...ती जमीन त्यांच्या नावावर व्हावी अशी त्यांची मागणी आहे...
वनजमीनीच्या हक्कासाठी आलेल्या मुंबईच्या आझाद मैदानात पोहचलेल्या महा मोर्चेकऱ्यांमध्ये पायाला दुखापती झालेले असे शेक़डो शेतकरी आहेत. आणि जोपर्यंत त्यांचा हक्क मिळत नाही, तोवर मुंबईतून हलणार नाही असा निर्धार हे आदिवासी शेतकरी बांधव व्यक्त करताय...
बाईट चौपालमधला...
सखुबाईंच्या पायाचे फोड फुटल्यानं आज सकाळी डॉक्टरांनी जखमांवर मलमपट्टी केलीय. आता सरकारही त्यांच्या मागण्यांवर लेखी आश्वासनांची मलमपट्टी करेल अशी त्यांची अपेक्षा आहे.