मुंबईच्या कक्षा रुंदावल्या, पालघर- रायगडमधील काही तालुके एमएमआरडीएच्या कक्षेत

मुंबई महानगराचा आणखीनच विस्तार 

Updated: Feb 20, 2019, 05:01 PM IST
मुंबईच्या कक्षा रुंदावल्या, पालघर- रायगडमधील काही तालुके एमएमआरडीएच्या कक्षेत title=

मुंबई : मुंबई महानगराच्या कक्षा आणखीनच रुंदावल्या आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात आता पालघर आणि रायगड जिल्ह्यांच्या काही तालुक्यांचा समावेश करण्यात आला. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय़ घेण्यात आला. पालघरच्या वसई तालुक्यालाही एमएमआरड़ीएच्या कक्षेत आणलं आहे. तर रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग, पेण, पनवेल आणि खालापूर तालुक्यातचाही एमएमआरडीत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई महानगराचा आणखीनच विस्तार झाला आहे. 

अनेक वर्षांपासून या भागातील विकासकामं रखडली होती. ग्रामपंचायती, नगरपालिका आणि महानगरपालिका अशा क्षेत्रांमधून जाणारे रस्ते कोणी बनवायचे याबाबत निर्णय होत नव्हते. त्यामुळे विकासकामांना खिळ बसली होती. हे सर्व तालुके मुंबईच्या आजुबाजुला असल्याने एमएमआरडीएला येथे काम करण्याच सोयीस्कर ठरेल. त्यामुळे आज मंत्रिमंडळात हा निर्णय घेण्यात आला. या भागाचा जलद विकास करण्याची जबाबदारी आता एमएमआरडीएकडे असणार आहे.