Mumbai Local Mega Block​ : धोकादायक कर्णाक पुलाचे इतके टक्के पाडकाम पूर्ण, मुंबईकरांना दिलासा

कर्णाक पुलाचे 30 टक्के पाडकाम पूर्ण लवकरच मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी येईल समोर.

Updated: Nov 20, 2022, 09:24 AM IST
Mumbai Local Mega Block​ : धोकादायक कर्णाक पुलाचे इतके टक्के पाडकाम पूर्ण, मुंबईकरांना दिलासा title=
so much demolition of the dangerous karnak bridge is complete a relief for mumbaikar nz

मनोज कुळकर्णी, झी मीडिया, मुंबई  Mumbai Local Mega Block​ : मध्य रेल्वे मार्गावरील  (Central Railway) 154 वर्षे जुना ब्रिटिशकालीन कर्नाक उड्डाणपूल (Carnac Bridge) पाडण्याचं काम सुरू झालंय. शुक्रवारी रात्री 11 वाजता हे पुल पाडण्याचं काम सुरू झालं. यासाठी जवळपास 700 अधिकारी आणि कर्मचारी काम करत असल्याचा पाहायला मिळते आहे. (so much demolition of the dangerous karnak bridge is complete a relief for umbaikars nz)

सकाळी सात वाजेपर्यंत 30 टक्के काम पूर्ण झालं. हे पाडकाम सुरू करण्यासाठी रेल्वे आणि पालिकेने नियोजन केल. लोखंडाचे मोठमोठे गर्डर काढण्यासाठी चार मोठ्या ट्रेन्स हायड्रोक्रेन्स सिलेंडर तयार ठेवण्यात आले आहेत. हे काम सुरू असल्यामुळे रेल्वेचा 27 तासाचा मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे सीएसटी कडे जाणाऱ्या जलद मार्गावरील लोकल तसेच हर्बल मार्गावरील लोकल बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर सीएसटीला येणाऱ्या आणि जाणाऱ्या मेल एक्सप्रेस गाड्या सुद्धा काही थांबवण्यात आल्या आहेत. तर काही रद्द करण्यात आल्या आहेत रेल्वेच्या नियोजनानुसार दुपारी चार वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कडे जाणारी जलद मार्गावरील लोकल सुरू करण्याचा प्रयत्न आहे

कर्नाक पुलाचा ब्रिटिशकालीन इतिहास

भारतातील पहिली रेल्वे धावली ती बोटीबंदर ते ठाणे.16 एप्रिल 1853 या दिवशी ही पहिली रेल्वे 36 किलोमीटर धावली. रेल्वेचा विस्तार होत गेला आणि त्यानंतर प्रवासी वाहतुकीसोबतच मालवाहतूक सुद्धा सुरू करण्यात आली. त्यावेळी कर्नाक ब्रिज या ठिकाणी रेल्वे पास होताना फाटक होतं आणि रेल्वे जाताना हे फाटक बंद केल्या जात होतं त्यामुळे प्रवास करायला खूप वेळ लागत होता. त्यावेळी इंग्रजांनी 1858 मध्ये कर्नाक हा पूल तयार केला. पुल तयार करण्याला दहा वर्षे लागली आणि नंतर या ठिकाणावरून पुलावरून वाहतूक सुरू झाली. 

हे ही वाचा - शिंदे गट गुवाहाटीला जाणार का? गुलाबराव पाटील यांनी दिले मोठे Update

मेगाब्लॉक काळात विशेष बस सेवा

या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेचे (central railway anil kumar) महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी गुरुवारी (17 नोव्हेंबर) अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन कर्नाक उड्डाणपूल पाडण्याच्या कामाचा आढावा घेतला. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून सर्व रेल्वे अधिकाऱ्यांना वेळेत काम पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. दरम्यान, ब्लॉकच्या कालावधीत बेस्टतर्फे सीएसएमटी, कुलाबा, भायखळा, दादर, वडाळा आदी परिसरात विशेष बस सोडण्यात येणार आहेत.

दोन मार्गांवर या वेळेत सेवा बंद -

सीएसएमटी ते भायखळा मार्गावर : 19 नोव्हेंबर रोजी रात्री 11 ते 20 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 
सीएसएमटी ते वडाळा रोड मार्गावर : 19 नोव्हेंबर रोजी रात्री 11 ते 20 नोव्हेंबर रोजी रात्री 8
7th line आणि यार्ड: 19 नोव्हेंबर रोजी रात्री 11 ते 21 नोव्हेंबर रोजी सकाळी 2