मुंबई : मंत्रालयातल्या उंदीर मारण्याच्या गैरव्यवहारात अनेक धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. ज्या संस्थेला हे कंत्राट देण्यात आले होते त्याच्या संचालकाचा २००८ मध्येच मृत्यू झाल्याचं उघड झालंय. दरम्यान, सध्या गाजत असलेल्या मंत्रालयातल्या उंदीर पुराणात आणखी एका धक्कादायक अध्यायाची भर पडलीय. माझगावच्या विनायक मजूर सहकारी संस्थेला हे उंदीर मारण्याचं कंत्राट देण्यात आलं होतं.
अमोल शेडगे यांच्या नावावर ही संस्था असून त्यांच्या नावानंच ती कार्यरत असल्याचं त्यांचे वडील आनंद शेडगे यांनी सांगितलं. आनंद शेडगे यांनी आपले नातेवाईक वामन देवकर यांच्या सल्ल्यानं २००२ साली विनायक सहकारी मजदूर संस्था स्थापन केली. आनंद यांचा मोठा मुलगा अमोल शेडगे याला मुख्य प्रोप्रायटर म्हणून ठेवण्यात आले.
यासाठी आवश्यक सगळी कागदपत्रं आनंद यांनी वामन देवकर यांना देऊ केली. मात्र याचा सर्व कारभार देवकर यांच्याकडे होता असल्याचा दावा आनंद शेडगेंनी केलाय. मात्र दोन वर्षांनी देवकरांनी ही संस्था रद्द केल्याचं सांगितल्याचं शेडगेंचं म्हणणं आहे.
आता मंत्रालयातला गैरव्यवहार समोर आल्यानंतर त्यांना संस्थेबाबत कळलंय. त्यामुळं आता ही संस्था कोण चालवतं त्याला शोधून शिक्षा करण्याची मागणी शेडगे कुटुंबीयांनी केलीय.
दरम्यान, सध्या गाजत असलेल्या मंत्रालयातल्या उंदीर पुराणात आणखी एका धक्कादायक अध्यायाची भर पडलीय. माझगावच्या विनायक मजूर सहकारी संस्थेला हे उंदीर मारण्याचं कंत्राट देण्यात आलं होतं. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी झी २४ तासचे प्रतिनिधी अमित कोटेचा सूर्यकुंड सोसायटीतील या संस्थेच्या पत्त्यावर पोहोचले, तेव्हा धक्कादायक खुलासा झाला. ही मजूर संस्था बोगस असून, संबंधित पत्त्यावर शेडगे नावाचं कुटुंब गेल्या २५ वर्षांपासून राहत असल्याची बाब समोर आलीय.