इंधन दरवाढीविरोधात शिवसेना रस्त्यावर उतरणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी शिवसेना आणि भाजपमध्ये मतभेदाचा भडका उडालाय.

Updated: Sep 17, 2017, 05:42 PM IST
इंधन दरवाढीविरोधात शिवसेना रस्त्यावर उतरणार  title=

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी शिवसेना आणि भाजपमध्ये मतभेदाचा भडका उडालाय. पेट्रोल, डिझेल आणि घरगुती सिलेंडरच्या सतत वाढणाऱ्या दरवाढीचा निषेध करण्यासाठी भाजप विरोधात शिवसेना महामोर्चा काढणार आहे.

या मोर्चाचं नेतृत्व शिवसेनेच्या महिला आघाडीकडे असणार आहे. शिवसेना नेत्यांची महिला आघाडीशी चर्चा करण्यासाठी बैठक होतेय. शिवसेना भवनात आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी शिवसेना महिला आघाडीची बैठक झाली. या बैठकीत हा महामोर्चा काढण्याचं निश्चित करण्यात आलं. नवरात्रीच्या काळात शिवसेना हा मोर्चा काढणार आहे.