Shivsena controversy : ..आणि त्या काकू ओक्साबोक्षी रडू लागल्या; सेना भवनाबाहेर शिवसैनिकांची गस्त

Shivsena : शिवसेनेचं नाव आणि चिन्हं शिंदे गटाकडे गेल्यानंतर उद्धव ठाकरे गटाकडूनही काही हालचालींना सुरुवात झाली. याचपार्श्वभूमीवर आज शिवसैनिकांनी शिवसेना भवनाबाहेर जोरदार शक्तिप्रदर्शन केले. 

Updated: Feb 20, 2023, 02:54 PM IST
Shivsena controversy :  ..आणि त्या काकू ओक्साबोक्षी रडू लागल्या; सेना भवनाबाहेर शिवसैनिकांची गस्त  title=

Shivsena Symbol Issue : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddha Thackeray) यांच्यांकडून शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह (Shiv Sena Symbol) गेल्यानंतर ठाकरे गटामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला. केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबतचा आदेश शुक्रवारी दिला आहे. निवडणूक आयोगाच्या निकालात शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाला दिले आहे. आता दादरमधील शिवसेना भवन आणि सामना, मार्मिक यांची मालकी कोणाकडे जाणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवसेना गेल्यावर उद्धव ठाकरे यांचा शिवसेना भवनावर अधिकार राहील का, हा प्रश्न आहे.  या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना भवनाबाहेर घोषणाबाजी सुरूवात केली. त्यांनी निवडणूक आयोगाच्या विरोधातही घोषणाबाजी केली. 

वाचा : SBI च्या ग्राहकांना झटका, आता खिशाला लागणार कात्री

शिवसेना चिन्ह आणि पक्ष शिंदे गटाला दिल्यामुळं ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. तर दुसरीकडे दादरमधील शिवसेना भवन (Shivsena Bhavan) हे पक्षाची मालकी नाही. हे भवन शिवाई ट्रस्टच्या मालकीचे आहे. शिवाई ट्रस्टचे अध्यक्ष लीलाधर डाके आहेत. ते उद्धव ठाकरे यांचे विश्वासू आहेत. तसेच इतर ट्रस्टीही उद्धव ठाकरे यांच्या विश्वासातील आहे. यामुळे पक्ष आणि चिन्ह गेले तरी शिवाई ट्रस्ट म्हणजेच शिवसेना भवन उद्धव ठाकरे यांचे राहणार आहे. असे असताना आज (20 फेब्रुवारी) शिवसैनिकांकडून शिवसेना भवनाबाहेर जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. या शक्तिप्रदर्शानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात येत होती.  तसेच हिंमत असेल तर शिवसेना भवनाला हात लावून दाखवा, असे आव्हान देखील ठाकरे गटाकडून शिंदे गटाला करण्यात आले. 

इतकेच नाही तर शिवसेनेचे चिन्ह आणि नाव अशा प्रकारे गेल्यानंतर अनेक शिवसैनिकांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. उद्धव ठाकरेंवर ही वेळ आल्याचे दुख शिवसैनिकांना अतिशय त्रास देत होते. असे व्हायला नको होते, अशी इच्छा अनेक जण व्यक्त करीत होते. याचवेळी महिला शिवसैनिक रडत रडत म्हणाल्या,  उद्धव साहेब तुम्ही एकटे नाहीत...,आम्ही आहोत तुमच्या मागे. कितीही षडयंत्र करू द्या, ह्यांचा काया नायलाट होणारचं...आई जगदंबा भवानी यांना बघून घेईल... ह्यांनी आमच्या उद्धव साहेबांना त्रास दिला त्यांच कधीच चांगल होणार नाही..अशी संतप्त प्रतिक्रीया महिला शिवसैनिकांनी झी 24 तास दिली.