मुंबई : केंद्रात आणि राज्यात सत्तेमध्ये भाजप आणि शिवसेनेत मात्र पुन्हा एकदा श्रेयवाद साठी आमने सामने येताना दिसत आहेत. कामाचे श्रेय लाटण्याचा नादात पुन्हा एकदा हे दोन्ही पक्ष एकमेकांच्या समोर आल्याचं दिसून आलं आहे.
कांदिवली पूर्वेत ठाकूर कॉम्प्लेक्स विभागात महानगरपालिका अग्निशमन दलाचे केंद्र उभारण्यात आले आहे. मात्र त्यानंतर सुरू झाली ती श्रेयवादाची लढाई. या उद्यानाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम दोन्ही पक्षांकडून वेगवेगळा ठरवण्यात आला. त्यामुळे या भागातलं राजकारण तापलंय. सुरुवातीला या कार्यक्रमाचं उद्घाटन शिवसेना संध्याकाळी पाच वाजता करणार होती. मात्र सेनेवर कुरघोडी करण्यासाठी भाजपने याच उद्यानाच्या उदघाटनाचा कार्यक्रम सकाळी अकरा वाजता असेल असे होर्डिंग्स लावले.
'कोणत्याही प्रकारचे कामे कराची नाही मात्र श्रेय घेण्यासाठी भाजप प्रत्येक वेळी पुढे धाव घ्यायची ही सवय आहे. खोट बोला पण रेटून बोला अशी भाजपची संस्कृती आहे.' अशी शिवसेनेकडून टीका करण्यात आली. 'मात्र कोणत्याही प्रकारची परावगी नसताना अनधिकृतपणे भाजपने उद्धटन केले आहे मात्र हे काम महानगरपालिकेचे आहे त्यासाठी अधिकृतपणे उद्घाटन करण्यासाठी प्रथम नागरिक म्हणून मी आलो आहे. परंतु स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी पाठवपुराव केला तर नक्कीच याचे पोस्टर लावले गेले पाहिजे.' असं महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी म्हटलं आहे.
2019 च्या निवडणुकीसाठी दोन्ही पक्षाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. मात्र शिवसेना एकला चलोच्या भूमिकेवर ठाम आहे, मात्र एकीकडे भाजपचे मोठे नेते शिवसेनेला कुरवाळण्याचा प्रयत्न करत आहेत तर दुसरीकडे स्थानिक पातळीवर मात्र दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने-सामने उभे राहताना दिसत आहेत. भाजप आमदार आशिष शेलार यांनी नालेसफाईच्या कामांवरुन देखील याआधी शिवसेनेवर टीका केली.
पाहा व्हिडिओ