निरुपमांचा शिवसेनेकडून समाचार, तर आठवलेंचीही टीका

संजय निरुपम यांचं वादग्रस्त वक्तव्य

Updated: Oct 8, 2018, 03:27 PM IST
निरुपमांचा शिवसेनेकडून समाचार, तर आठवलेंचीही टीका title=

मुंबई : उत्तर भारतीय आहेत म्हणून मुंबई चालते या संजय निरुपम यांच्या वक्तव्याचा शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी समाचार घेतला आहे. निरुपम यांनी आपली औकात विसरु नये अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. तर संजय निरूपम यांनी उत्तर भारतीय आणि मराठी असा वाद निर्माण करू नये अशी टीका रामदास आठवले यांनी केली आहे.

...तर संपूर्ण मुंबई ठप्प होईल

भाषिक वाद पुन्हा उफाळेल असं वक्तव्य मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरूपम यांनी केलं आहे. मुंबई आणि महाराष्ट्र उत्तर भारतीय चालवतात. फक्त एक दिवस या समाजाने काम केलं नाही तर संपूर्ण मुंबई ठप्प होईल अशी वल्गना त्यांनी नागपुरात उत्तर भारतीयांच्या वार्षिक सभेत केली. 

निरूपमांचा ताठा कायम

ऐवढं होऊनही निरूपम यांचा ताठा कायम आहे. राज्य सरकारची धोरणं उत्तर भारतीय विरोधी असल्याचा सूर त्यांनी आळवला. रिक्षासाठी मराठी भाषा सक्ती, फेरीवाला धोरण हे उत्तर भारतीय विरोधी असल्याचं ते म्हणाले.

वाद निर्माण करण्याचा प्रयत्न

मुंबई शहराच्या योगदानात सर्वच भाषिक, प्रांतिक समाजांचा सहभाग आहे याबाबत दुमत नाहीच. पण त्याआधारे भाषिक वादंग निर्माण करण्याचा आणि चर्चेत राहण्याचा संजय निरूपम यांचा प्रयत्न संतापजनकच म्हणावा लागेल.