'शिवसेनेचे १९ आमदार भाजपच्या संपर्कात'

शिवसेनेसोबत काँग्रेसचे आमदारही भाजपच्या संपर्कात असल्याची प्रतिक्रिया खासदार नवनीत राणा यांनी दिली आहे.

Updated: Nov 23, 2019, 12:08 PM IST
'शिवसेनेचे १९ आमदार भाजपच्या संपर्कात' title=

मुंबई : शिवसेनेचे १९ आमदार आमच्या संपर्कात असल्याची माहिती भाजपतील सुत्रांकडून मिळत आहे. असे झाल्यास शिवसेनेला मोठे खिंडार पडण्याची शक्यता आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का असेल. महाराष्ट्राच्या राजकारणात आज खळबळजनक घटना घडल्या आहेत. कालपर्यंत महाविकासआघाडी सत्तेत येणार आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार असे चित्र होती. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. 

शिवसेनेसोबत काँग्रेसचे आमदारही भाजपच्या संपर्कात असल्याची प्रतिक्रिया खासदार नवनीत राणा यांनी दिली आहे. याबाबत शरद पवार यांना सगळं माहित होतं असा दावाही त्यांनी केला आहे. शरद पवारांची सहमती होती आणि पडद्यामागे बऱ्याच गोष्टी घडल्याचेही त्या म्हणाल्या. 

अजित पवार आणि त्यांच्यासोबत जाणाऱ्या आमदारांना जनता रस्त्यावर उभे करणार नाही अशी तीव्र प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली होती. त्यामुळे शिवसेनेलाही आमदार फुटीची भीती आहे का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षनेता गटनेता असल्याचे पत्र आहे. त्यांनी ते मिळवलं आणि राज्यपालांकडे दिले. आता अजित पवार आणि शरद पवार हे आमदरांशी फोनवर संपर्कात आहेत. त्यामुळे 

राज्यात राष्ट्रपती शासन आले. एक खिचडी होण्याचा प्रकार सुरु होता. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी आम्हाला समर्थन दिले. अन्य काही नेत्यांनीही आम्हाला पाठींबा दिला. राज्यपाल आम्हाला बहुमत सिद्ध करण्यासाठी पत्र देतील आम्ही बहुमत सिद्ध करु असा विश्वास मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.