Uddhav Thackeray : "Amazon वरुन आलेलं पार्सल परत न गेल्यास...", उद्धव ठाकरे यांचा महाराष्ट्र बंदचा इशारा

 शिवसेना (Shiv Sena) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) चांगलेच आक्रमक झाले आहेत. 

Updated: Nov 24, 2022, 05:55 PM IST
Uddhav Thackeray : "Amazon वरुन आलेलं पार्सल परत न गेल्यास...", उद्धव ठाकरे यांचा महाराष्ट्र बंदचा इशारा title=

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj) यांच्याबाबत केलेल्या त्या वादग्रस्त वक्तव्याबाबत शिवसेना (Shiv Sena) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) चांगलेच आक्रमक झाले आहेत. आंदोलन केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी वेळ पडल्यास महाराष्ट्र बंदचही हाक देऊ, असा इशाराही ठाकरे यांनी दिला. तसेच अ‍ॅमेझॉनने आलेले हे पार्सल अ‍ॅमेझॉनने परत गेले तर चांगले आहे. त्यांच्याजागी सक्षम व्यक्ती यायला हवी, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांवर निशाना साधला.  ते मुंबईत (Mumbai) पत्रकारांशी संवाद साधत होतेय. (shiv sena ubt uddhav thackeray aggresive over to governor bhagat singh koshyari controversial statement over to chatrapati shivaji maharaj)

महाराष्ट्राची सातत्याने अवहेलना

"राज्याबाहेर उद्योग पळवण्याबाबत असो की महाराष्ट्राची अस्मिता दुखावण्याबाबत असो,  महाराष्ट्राची सातत्याने अवहेलना होतेय. त्यात आता कर्नाटकचे मुख्यमंत्र्यांमध्ये भूत संचारलंय. जणू काही महाराष्ट्रात माणसं राहतच नाही. महाराष्ट्राला अस्मिता, स्वाभिमान, हिंमत, धमक आणि शक्ती असं काहीच नाहीय. कुणीही यावं टपली मारुन जावं आणि आम्ही शिवाजी महाराज की जय असं बोलून नुसतंच गप्प बसावं. आतापर्यंत खूप झालं. महाराष्ट्र शिवाजी महाराजांनो मानतो हे काही वेगळचं सांगायची गरज नाही. महाराजांचा अपमान झाल्यानंतर मुळमुळीत प्रतिक्रिया दिल्या जात आहेत", अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता भाजपवर राज्यात सुरु असलेल्या परिस्थितीवरुन टीका केली.  

आता का नाही यांच्या अंगावर जात?

"शिवरायांचा अपमान करणाऱ्यांनी आम्हाला सावरकरांचं महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करु नये. सावरकरांचा अपमान झाल्यानंतर आम्हीही गप्प राहिलो नाही. आम्ही लगेगच पत्रकार परिषद घेतली. राहुल गांधी यांनीही हा विषय टाळला. मात्र तेव्हा जसे अंगावर आले तसेच आता का नाही यांच्या अंगावर जात", असा सवालही उद्धव ठाकरे यांनी विचारला.