बहुचर्चित शीना बोरा हत्याकांडातील शीना बोरा जिवंत ? कुठे आहे शीना ? मग सापडलेला मृतदेह कोणाचा?

शीना बोरा ही इंद्राणी मुखर्जी हिची मुलगी. मात्र मुलीच्या हत्ये प्रकरणात इंद्राणी मुखर्जी जेल मध्ये कैद होती. 

Updated: Nov 3, 2022, 07:45 PM IST
बहुचर्चित शीना बोरा हत्याकांडातील शीना बोरा जिवंत ? कुठे आहे शीना ? मग सापडलेला मृतदेह कोणाचा? title=
Sheena Bora alive in the famous Sheena Bora murder case where is sheena So whose body was found nz

प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई :  शीना बोरा ही इंद्राणी मुखर्जी हिची मुलगी. मात्र मुलीच्या हत्ये प्रकरणात इंद्राणी मुखर्जी जेल मध्ये कैद होती. शीना बोरा चा मित्र आणि तिचा होणारा पती राहुल मूखर्जी याने वरळी पोलीस ठाण्यात 2012 मध्ये तक्रार केली होती की शीना ही बेपता आहे. मात्र त्याची तक्रार घेतली नव्हती. 23 मे 2012 ला महाराष्ट्रातील रायगडमध्ये पोलिसांना एक सडलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला, तर तो मृतदेह  सीबीआयने हा शीना बोराचा असल्याचा दावा केला गेला. तर इंद्राणी मुखर्जी यांच्या ड्रायव्हरचा जवाब घेतला. (Sheena Bora alive in the famous Sheena Bora murder case where is sheena So whose body was found nz)

हे ही वाचा - कोल्हापूर हा ट्रेलर होता खरा पिच्चर दाखवायला लावू नका, नितेश राणेंचा इशारा

21 ऑगस्ट 2015 रोजी इंद्राणी मुखर्जीचा माजी ड्रायव्हर श्यामवर राॅय याला अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आणि त्याने पोलिसांना दिलेल्या जवाबात तीन वर्षांपूर्वी शीनाची हत्या आणि गुन्ह्यात इंद्राणी सहभागी असल्याचा दावा केला होता. यावर 25 ऑगस्ट 2015 इंद्राणी मुखर्जीला मुंबई पोलिसांनी अटक केली.तर याच गुन्ह्यात 19 नोव्हेंबर 2015 रोजी इंद्राणीचा तत्कालीन पती पीटर मुखर्जीला सीबीआयने अटक केली. आता दोघेही जामीनावर बाहेर आहेत. तर शीना बोरा प्रकरणात न्यायालयात खटला सुरू असून साक्षीदार यांचा जावाब नोंदवला जात आहे. 

हे ही वाचा - पत्नीला कार शिकवताना विहिरीत पडली कार... पत्नी व मुलीचा मृत्यू...

 

आज न्यायालयात शीना चा मित्र राहुल याचि उलट तपासणी झाली असता त्याने दिलेल्या जवाबात आणि आजच्या तपासणीत तफावत असल्याचा दावा इंद्राणी मुखर्जी च्या वकिलांनी केला आहे. त्यामुळे शीना बोरा हिची हत्या झाली नसल्याचा देखील दावा केला आहे. राहुल मुखर्जी आणी शीना बोरा ह्या 24 एप्रिल 2012 नंतरही संपर्कात असल्याचे पुरावे असल्याचा दावा करण्यात आला आहे तर 24 एप्रिल नंतरही, इंद्राणी चा ड्रायव्हर श्यामवर रॉय आणी शीना चा मित्र राहुल एकमेकांच्या संपर्कात असल्याचे पुरावे आहेत असा दावा इंद्राणी चे वकील रणजीत सांगळे यांनी केला आहे, आज न्यायालयात राहुल मुखर्जी ची उलट तपासणी दरम्यान त्याने बऱ्याच प्रश्नांना मला माहित नाही,मला आठवत नाही,अशी उत्तरं दिलीत तर शीना कुठे आहे याचा ठाव ठिकाणा राहुल लाच माहिती असल्याचा धक्कादायक दावा करण्यात आला आहे. 

हे ही वाचा - देशातील पहिली बुलेट-ट्रेन कधी धावणार? आरटीआयमधून मोठा खुलासा

तर सी बी आय च्या आरोपा नुसार इंद्रायणी मुखर्जी , पीटर मुखर्जी आणि इतर आरोपी आहेत. तर इंद्रायणी च्या वकिलांच्या दाव्यानुसार सापडलेला तो मृतदेह शिनाचा नसल्यास मग तो मृतदेह कोणाचा ? हा देखील प्रश्न निर्माण होत आहे. न्यायालयात सुनावणी सुरू असून अजून वेगवेगळे ट्विस्ट निर्माण होण्याची शक्यता आहे.या खटल्याची सुनावणी सी बी आय च्या विशेष न्यायालयात सुरू असून, सीबीआय ने इंद्राणी, पीटर आणि संजीव खन्ना यांच्यावर शीना बोराची हत्या, कट रचणे, अपहरण करणे, पुरावे नष्ट करणे आणि खोटी माहिती देणे या प्रकरणी आरोप केले आहेत.