मुंबई : गेल्या वर्षभरात शेअर बाजारात एकतर्फी वाढ दिसून आली. कोरोना संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे 23 मार्चपासून शेअर बाजारात मोठी पडझड झाली होती. परंतु त्यानंतरच शेअर बाजार वाढतच राहिला. 23 मार्चची तुलना केली तर अनेक असे शेअर आहेत ज्यांच्या किंमतींमध्ये वाढ होऊन त्यांनी गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे.
Deepak Nitrite: दिपक नायट्रेटचा शेअर गेल्या वर्षी 23 मार्च रोजी 325 रुपये होता. तोच शेअर आज 1531 रुपये इतका झाला आहे. एवढेच नाही तर हा शेअर या महिण्यात 1600 पर्यंत गेला होता.
Adani Green: अदानी ग्रुपच्या सर्वच कंपन्यांनी गेल्या वर्षभरात गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. अदानी ग्रीन एनर्जीचा शेअर वर्षभरात 10 पट वाढला आहे. गेल्यावर्षी अदानी ग्रीन एनर्जीचा शेअर 135 रुपयांच्या आसपास होता तर, आता हाच शेअर सध्या 1252 रुपयांवर पोहचला आहे.
Aarti Drugs : गेल्या वर्षभरात कोरोना संसर्गामुळे फार्मा कंपन्यांच्या शेअर्समध्ये चांगलीच वाढ झाली होती. त्यापैकी एक आरती ड्रग्ज कंपनीसुद्धा आहे. गेल्यावर्षी 23 मार्च रोजी या कंपनीच्या शेअर्सची किंमत 115 रुपये होती. आता या शेअरची किंमत 733 रुपये इतकी आहेत
Alok Industries : अलोक इंडस्ट्रीजचा शेअर 23 मार्च 2021 रोजी 5.20 रुपयांवर होता. आता हा शेअर 20 रुपयांच्या जवळपास आहे.
Dixion Technologies : या कंपनीच्या शेअर्सने देखील वर्षभरात दमदार कमाई केली आहे. गेल्या वर्षी हा शेअर 643 रुपयांवर होता तर, आता या शेअरची किंमत 4054 रुपये आहे.
Adani Port : लार्ज कॅप कंपनी असलेल्या अदानी पोर्टनेदेखील गुंतवणूकदारांना तीन पट परतावा दिला आहे. गेल्या वर्षी हा शेअर 207 रुपयांवर होता. तर आता हाच शेअर 744 रुपयांवर पोहचला आहे.
Tata Motors : टाटा मोटार्सचा शेअरनेही गुंतवणूकदारांना खुश केले आहे. गेल्या वर्षी टाटा मोटार्सचा शेअर 66 रुपये इतका होता. तर आज याच शेअरची किंमत 307 रुपये आहे.
State Bank of India : सरकारी बँक एसबीआयने आपल्या गुंतवणूकदारांना वर्षभरात चांगली कमाई करून दिली आहे. गेल्यावर्षी 181 रुपये होता तर आता याच शेअरची किंमत 367 रुपयांवर पोहचली आहे.