Share market today! गुढीपाडव्याच्या दिवशी या स्टॉक्सवर ठेवा नजर, Yes Bank, TCS, Adani Group

 आजच्या दिवसात शेअर मार्केटचा ओघ कोणत्या बाजूने असणार याचा अंदाज घेऊन आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय ते महत्वाचे स्टॉक्स 

Updated: Apr 13, 2021, 08:53 AM IST
Share market today! गुढीपाडव्याच्या दिवशी या स्टॉक्सवर ठेवा नजर, Yes Bank, TCS, Adani Group title=

मुंबई :  आजच्या दिवसात शेअर मार्केटचा ओघ कोणत्या बाजूने असणार याचा अंदाज घेऊन आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय ते महत्वाचे स्टॉक्स जे तुम्हाला मालामाल करू शकतात. तर कोणते आहेत ते स्टॉक्स ज्यावर असली पाहिजे तुमची नजर. वाचा

Tata Consultancy Services: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ही आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी असून तीला चौथ्या तिमाहीमध्ये चांगला नफा झाला आहे. कंपनीचा नफा 14.9 टक्क्यांनी वाढला आहे.  कोरोनामुळे वाढ झालेल्या डिझिटलायझेनचा फायदा कंपनीला झाला आहे. त्यामुळे कंपनीच्या महसुलातही वाढ झाली आहे.

Dr Reddy’s Laboratories: 
भारताने रशियाच्या स्पुटनिक लशीला आरोग्य आणिबाणीच्या आधारावर मान्यता दिली आहे. ही लस भारतीय फार्मा कंपनी डॉ. रेड्डी लॅबोरटोरीझला विकू देण्याची परवानगी देण्यात आली आहे.

Auto stocks:प्रवासी वाहनांच्या विक्रीमध्ये मार्च ते मार्च मध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. ,त्यामुळे ऑटो सेक्टरकडेही लक्ष असायला हवे.

Yes Bank: अतिरिक्त टिअर 1 बॉंड गैरविक्री प्रकऱणी सेबीने येस बँकेवर 25 कोटीचा दंड आकारला आहे. सेबीने माजी अधिकारी विवेक कन्वर यांना सुद्धा 1 कोटीचा दंड आकारला आहे.

Adani Group: फ्लिपकार्ट आणि अदानी गृप दोघांनी भागीदारीतून सप्लाय चैन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ई कॉमर्स क्षेत्रात दोन्ही कंपन्या सोबत काम करणार आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती आणि कस्टमरबेस सर्विसेस वाढणार आहेत.

ONGC: नैसर्गिक गॅस विकण्यासाठी कंपनीने लिलाव सुरू केला आहे. त्याचा कंपनीला नक्कीच फायदा होणार आहे.

IDBI Bank:आयडीबीआय बँकेतील 45 टक्के सरकारी भागभांडवलाची विक्री करण्याच प्रस्तावावर केंद्रीय मंत्रीमंडळ लवकरच विचार करणार आहे. भारत सरकारच्या निर्गुंतवणूकीकरणाच्या धोरणाचा भाग म्हणून याकडे पाहले जात आहे.