शेअर बाजार गडगडला; पाच महिन्यांच्या निच्चांकी पातळीवर

सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण झाल्याने गुंतवणूकदारांनी समभाग विकायला सुरुवात केल्याचे चित्र आहे.

Updated: Aug 5, 2019, 10:36 AM IST
शेअर बाजार गडगडला; पाच महिन्यांच्या निच्चांकी पातळीवर title=

मुंबई: आठवड्याच्या सुरुवातीलाच भांडवली बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. आज बाजार उघडल्यानंतर सेन्सेक्स २७६ अंकांनी खाली येत ३६,८४२.१७ पातळीवर पोहोचला. यापूर्वी शुक्रवारी सेन्सेक्स ९९.९० अंकांनी वधारत ३७,११८ च्या पातळीवर बंद झाला होता. तर निफ्टी १०,९९७.३५ च्या पातळीवर थांबला होता. 

मात्र, जागतिक बाजारपेठेतील नकारात्मक वातावरणामुळे भांडवली बाजारात घसरण पाहायला मिळत आहे. पहिल्याच सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण झाल्याने गुंतवणूकदारांनी समभाग विकायला सुरुवात केल्याचे चित्र आहे.

तत्पूर्वी बाजार उघडण्यापूर्वी प्री-ओपनिंग सेशनमध्ये भांडवली बाजारातील वातावरण संमिश्र होते. सकाळी ९ वाजता सेन्सेक्स ४६.७० अंकांनी वधारत ३७१६४.९२ च्या पातळीवर पोहोचला होता. तर निफ्टी १०९३१ च्या पातळीवर व्यवहार करत होता. 

दरम्यान, जुलै महिन्याच्या वाहनविक्रीत अपेक्षेप्रमाणे मोठी घट दिसून आली होती. पायाभूत क्षेत्रातील वाढीचा दर गेल्या वर्षांच्या तुलनेत या वर्षीच्या पहिल्या तिमाहीत ५.५ टक्यावरून २.२ टक्क्यांवर घसरला आहे. त्यामुळे येत्या आठवडय़ातील पतधोरण बठकीत रिझव्‍‌र्ह बँकेकडून अपेक्षित पाव टक्क्यांपेक्षा मोठय़ा दरकपातीची अपेक्षा बाजाराला आहे.