RBI नं घेतलेल्या कठोर निर्णयाचा शेअर मार्केटला फायदा? पाहा कुठे करावी अचूक गुंतवणूक

Reserve Bank Repo Rate: आरबीआयनं नुकतंच रेपो रेटमध्ये वाढ केल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे बॅंकांचे व्याजदर (interest rate hike) वाढणार असून आत्ता सर्वसामान्यांना आपला EMI वाढवून बॅंकेला परत द्यावा लागणार आहे. 

Updated: Dec 9, 2022, 05:38 PM IST
RBI नं घेतलेल्या कठोर निर्णयाचा शेअर मार्केटला फायदा? पाहा कुठे करावी अचूक गुंतवणूक title=
rbi and share market

Reserve Bank Repo Rate: आरबीआयनं नुकतंच रेपो रेटमध्ये वाढ केल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे बॅंकांचे व्याजदर (interest rate hike) वाढणार असून आत्ता सर्वसामान्यांना आपला EMI वाढवून बॅंकेला परत द्यावा लागणार आहे. परंतु या परिस्थितीतही एक आनंदाची बातमी समोर येते आहे. रिझर्व्ह बॅंकेच्या रेपो रेटमध्ये वाढ केल्यानंतर बॅंकिंग कंपन्यांनी आपल्या शेअरमधून गुंतवणूकदारांना बंपर परतावा दिला आहे. त्यामुळे सध्या शेअर बाजारात बॅंकिंग क्षेत्र हे आघाडीवर आहे. समोर आलेल्या माहितीनूसार, आरबीआयच्या या निर्णयानंतर सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी (share market) पाहायला मिळते आहे. सध्या काही नामवंत बॅंकांच्या शेअर्समध्ये विक्रमी वाढ झाल्याचे पाहायला मिळते आहे. यामध्ये पंजाब नॅशनल बॅंक, कॅनरा बॅंकसह बऱ्याच पीएसयू बॅंकाचा समावेश आहे. यात अनेक बॅंकांचे शेअर्स हे 52 आठवड्यांच्या रेकॉर्ड लेवलवर पोहोचले आहेत. (share market news today rbi repo rate impact public sector banks jumps 52 week high levels)

रिझर्व्ह बॅंकचा शेअरही वाढला 

RBI च्या शेअरमध्येही 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. कालच्या व्यवहारातील माहितीनुसार सेंट्रल बॅंकेच्या शेअर्समध्ये 28.26 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. यावेळीच कंपनीचे शेअर्स 25 रुपयांवरून 32.45 रुपयांपर्यंत वाढले आहेत. सध्या शेअर बाजारात अनेक शेअर्स हे विक्रमी पातळी गाठली असल्याने सेंट्रल बॅंकेचा हा शेअर 33.25 च्या वर पोहचला आहे. 

'या' बॅंकेने मारली उसळी 

बॅंक ऑफ बडोदाच्या (Bank of Baroda) शेअर्समध्ये 6.5 टक्क्यांची वाढ झाली आहे. गुरूवारच्या म्हणजे कालच्या व्यवहारानंतर बॅंक ऑफ बडोदाच्या शेअर्समध्ये 10 रूपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे अशी माहिती समोर येते आहे. त्यानंतर हा शेअर 187.40 च्या पातळीवर पोहोचला आहे. या स्टॉकचा 52 आठवड्यांचा उच्चांक 189.40 रुपये इतका आहे. 

7.69 टक्क्यांनी वाढला शेअर 

इंडियन ओव्हरसीज बँकेचे शेअर्सही 7.69 टक्क्यांनी वाढले आहेत. कालच्या वाढीनंतर कंपनीच्या शेअरने 25.90 रुपयांची पातळी गाठल्याचे समोर आले आहे. या शेअरनं 52 आठवडे बाजारात 26.05 ची विक्रमी पातळी देखील केली आहे. याशिवाय यूको बँकेचा शेअर 7.42 टक्क्यांनी तर पंजाब नॅशनल बँकेचा शेअर 4.42 टक्क्यांनी वाढला आहे. कॅनरा बँकेचा शेअर 3.38 टक्क्यांनी वाढला आहे. त्याचवेळी बँक ऑफ इंडियाचे शेअर्स 8.67 टक्क्यांनी वधारले आहेत. बँक ऑफ महाराष्ट्रचे शेअर्सही 4.68 टक्क्यांनी वाढले आहेत.