शरद पवार सहकुटुंब श्रीगणेशाच्या दर्शनासाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी

महाराष्ट्रात महाविकासआघाडी झाल्यानंतर पवार आणि ठाकरे कुटुंबीयांतील जवळीक वाढलीये. 

Updated: Sep 11, 2021, 09:14 PM IST
शरद पवार सहकुटुंब श्रीगणेशाच्या दर्शनासाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी title=

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे पत्नी प्रतिभाताई तसेच खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती सदानंद सुळे यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी  श्रीगणेशाचे दर्शनासाठी पोहोचले आहेत.

महाराष्ट्रात महाविकासआघाडी झाल्यानंतर पवार आणि ठाकरे कुटुंबीयांतील जवळीक वाढलीये. राज्यातील विविध प्रश्नांवर शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सातत्यानं भेटी आणि बैठका होत असतात. पण आज गणेशोत्सवाच्या निमित्तानं दोन्ही कुटुंबं एकत्र आले.

मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर दरवर्षी श्रीगणेशाची प्रतिष्ठापना केली जाते.