मुंबई : शरद पवार असो किंवा मुख्यमंत्री अनिल परब यांना कुणीही वाचवू शकणार नाहीत. अनिल परब आणि अनिल देशमुख यांना जेलमध्ये जावंच लागेल असा घणाघात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. ईडी कारवाईसाठी किरीट सोमय्या यांनी अनेक वेळा तक्रारी केल्या होत्या. कारवाई सुरू झाल्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर हल्लाबोल सुरूच ठेवला आहे.
अनिल परब यांनी केलेल्या बेकायदेशीर बांधकामावर कारवाईचे आदेश दिले गेले आहेत. त्यानंतरही एखादा मंत्री मंत्रिमंडळात कसं राहू शकतो? अनिल परब यांची ताबडतोब मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे. मुंबईत भाजप कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
अनिल परब यांनी रिसॉर्टचं विना परवानगी बांधकाम केलं. त्यांना जो फोर्ज परवाना होता तो 5 हजार स्क्वेअर फूटचा होता, त्यांनी 17 हजार 800 स्क्वेअर फूट बांधकाम केलं. महत्वाचं म्हणजे 26 जून 2019 ला अनिल परब यांनी ग्रामपंचायतीला पत्र लिहिलं होतं, हे रिसॉर्ट माझं आहे. त्यांनी 2019-20 आणि 2020-21 चा मालमत्ता कर भरलेला आहे. त्यांच्या नावाने पावती आहे, त्यांच्या खात्यातून पैसे देण्यात आले, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.
हे रिसॉर्ट बांधण्यात 5 कोटी 42 लाख 44 हजार 200 रुपये खर्च झाले आहेत. नाही. मग रिसॉर्ट बांधण्याचा पैसा कुठून आला? सचिन वाझेचा वसुलीमधला पैसा होता? इडीने मनी लॉन्डरिंग मध्ये चौकशी केली पाहीजे, अनिल परब मंत्रीमंडळात कसे राहू शकतात त्यांची हाकालपटटी करण्यात यावी, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे. अनिल परब यांनी अनधिकृत बांधकाम केले त्यांना वाचवण्याचे काम उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे करत आहे, असा आरोपही सोमय्या यांनी केला आहे.
अनिल देशमुख यांच्यानंतर आता अनिल परब यांचा नंबर लागणार असल्याचा इशाराही सोमय्या यांनी दिला आहे. ईडीने अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 100 कोटींहून अधिक कोटींची अफरातफतर आहे. अनिल देशमुख यांना हिशेब द्यावा लागणार, असं सोमय्या यांनी म्हटलं आहे.