शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपाचा दुसरा दिवस

१७ लाख सरकारी कर्मचाऱ्यांचा संप

Updated: Aug 8, 2018, 10:15 AM IST
शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपाचा दुसरा दिवस title=

मुंबई : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा आज दुसरा दिवस आहे. सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी राज्यातील सुमारे १७ लाख सरकारी कर्मचाऱ्यांनी संप सुरू केलाय. कर्मचारी मोठ्याप्रमाणात संपामध्ये सहभागी झाले. सरकारी कार्यालयं, महसूल विभाग, महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी सगळेच संपामध्ये हिरीरीनं सहभागी झालेत. रूग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी आणि परिचारीका संपावर आहेत. त्यामुळे रूग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. 

राज्यव्यापी सरकारी कर्मचाऱ्याच्या संपाचे पडसाद मंत्रिमंडळ बैठकीतही उमटले. राज्यात आंदोलनांचं लोण सुरू असताना संपाची वेळ चुकीची असल्याचं सांगत कर्मचा-यांवर कारवाई करण्याची मागणी रावते यांनी केली. तसंच त्यावर भाजपाचे मंत्री विनोद तावडे यांनी जोरदार आक्षेप नोंदवला. मात्र हे प्रकरण एवढे वाढले की बाकीचे उपस्थित मंत्रीही क्षणभर अवाक झाले. अखेर मुख्यमंत्रीसह इतर मंत्री यांनी मध्यस्थी करत हे प्रकरण शांत केलं.