मुंबईतील शाळा उद्या नाही तर 'या' तारखेपासून सुरु होणार

Reopen School In Mumbai : राज्यात उद्यापासून शाळा सुरु करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मात्र, मुंबईतील शाळा उद्यापासून सुरु होणार नाहीत. 

Updated: Nov 30, 2021, 02:14 PM IST
मुंबईतील शाळा उद्या नाही तर 'या' तारखेपासून सुरु होणार title=
संग्रहित छाया

मुंबई : Reopen School In Mumbai : राज्यात उद्यापासून शाळा सुरु करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मात्र, मुंबईतील शाळा उद्यापासून सुरु होणार नाहीत. तर 15 डिसेंबरला शाळा उघडणार आहेत. मुंबईत पहिली ते सातवीच्या शाळा आता पंधरा डिसेंबरपासून सुरु होणार आहेत. तसा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, शाळा सुरु करण्याची तयारी शाळा प्रशासनाची झाली होती, असे शिक्षकांकडून सांगण्यात आले. (Schools in Mumbai will start from 15th December)

शाळा सुरु होणार असल्या तरी पालकांमध्ये कोरोनाच्या नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनची भीती आहे. (Corona new variant Omicron) त्यामुळे मुंबईतील पहिली ते चौथीच्या शाळा सुरू होण्याची शक्यता कमी, असे सांगितले जात होते. दरम्यान, मुंबई महापालिका आज याबाबत निर्णय घेतला आहे की, 15 डिसेंबरपासून शाळा सुरु करण्यात येतील.  

कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनमुळे ( Omicron) पालकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे शिक्षण आयुक्तांनी शाळा सुरु करण्याबाबत मनपा आयुक्तांकडे प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावावर मुंबई मनपाने निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता शाळा पंधरा डिसेंबरपासून सुरु होणार आहेत. पालकांची संमती असेल तर मुलांना शाळेत पाठविण्याची अट आहे. तसेच ऑनलाईन शाळा सुरु राहणार आहेत.

राज्य सरकारने अखेर 1 डिसेंबरपासून पहिलीपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र अचानक ओमायक्रॉन व्हेरियंटने एन्ट्री घेतल्याने शाळांबाबत पुन्हा एकदा संभ्रम निर्माण झाला. शाळा सुरू होणार की नाही, यावरून तर्क वितर्क लढवले जात असतानाच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या संभ्रमावरून पडदा हटवला. मुंबईतील शाळांबाबतही तसाच संभ्रम होता.

पहिली ते सातवी शाळा सुरू करण्यावर सध्यातरी शिक्षण विभाग ठाम आहे. त्यासाठी मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्यात. शाळेचा सर्व परिसर निर्जंतूक केलेला असावा. सर्व कर्मचाऱ्यांनी दोन्ही डोस तातडीने पूर्ण करावेत. विद्यार्थ्यांना सॅनिटायझर, मास्क देण्यात यावेत. विद्यार्थ्यांची गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. सामूहिक खेळ खेळण्यास तसेच एकत्र डबा खाण्यास मनाई करण्यात आली आहे.