मुंबईतल्या शाळा-कॉलेजेस आज बंद राहणार

मुंबईत मंगळवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा जोर पाहता आज(बुधवार) मुंबईतील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. मुंबई शहर आणि उपनगरातल्या शाळा उद्या बंद राहणार आहेत.

Updated: Sep 20, 2017, 08:25 AM IST
मुंबईतल्या शाळा-कॉलेजेस आज बंद राहणार title=

मुंबई : मुंबईत मंगळवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा जोर पाहता आज(बुधवार) मुंबईतील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. मुंबई शहर आणि उपनगरातल्या शाळा उद्या बंद राहणार आहेत.

शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी ही घोषणा केली आहे. दिवाळीच्या सुट्टीमधून उद्याची सुट्टी कमी करण्यात येणार आहे.

दरम्यान, येत्या २४ तासात कोकण आणि उत्तर मध्य तसेच दक्षीणमध्य महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज मुंबईच्या कुलाबा वेधशाळेनं वर्तवला आहे. सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. २१ सप्टेंबरनंतर  मराठवाड्याच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता असून येत्या ७२ तासात विदर्भात वरुणराजा बरसणार आहे.