'बंदीचा प्रयत्न केला तरी बेळगावला जाणार'

संजय राऊतांचा निर्धार 

Updated: Jan 18, 2020, 07:53 AM IST
'बंदीचा प्रयत्न केला तरी बेळगावला जाणार' title=

मुंबई : महाराष्ट्राचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना कर्नाटक पोलिसांच्या मुजोरीला सामोरं जावं लागलं आहे. सीमा लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील नेते येवू नयेत म्हणून कर्नाटक पोलिसांकडून वाहनांची तपासणीही सुरू होती. मात्र गनिमी काव्यानं येड्रावकर हुतात्मा चौकात पोहोचले होते. मात्र त्यांना तेथे धक्काबुक्की करण्यात आली. याचा खासदार संजय राऊत यांनी निषेध व्यक्त करून एक निर्धार केला आहे.  

 संजय राऊतांनी ट्विट करून, 'बेळगावला जायला बंदी घातली तरी कार्यक्रमाला जाणारच, असा निर्धार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.  शुक्रवारी बेळगावला मंत्री राजेंद्र यड्रावकर यांना धक्काबुक्की करण्यात आली, त्याचा निषेध राऊतांनी केला आहे. पाहा संजय राऊतांच ट्विट .. (आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची सुटका) 

संजय राऊत यांनी बेळगावला जाण्याचा निर्धार केल्याने, महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर तणाव निर्माण होण्याची चिन्हं आहेत. यड्रावरकर यावेळी सीमा लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी अभिवादन करत असताना कर्नाटक पोलिसांनी त्यांना रोखलं आणि धक्काबुक्की केली. त्यानंतर यड्रावकरांना अटकही करण्यात आली. त्यामुळे याठिकाणी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र त्यानंतर कर्नाटक पोलिसांनी यड्रावकरांना महाराष्ट्रात आणून सोडल होतं. यानंतर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.