मुंबई : Shiv Sena Leader Sanjay Raut: शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत आज (शुक्रवारी) अंमलबजावणी संचालनालयासमोर ( ED) हजर होणार आहेत. पत्राचाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीने राऊत यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे. संजय राऊत यांनी ट्विट करुन ईडीसमोर हजर झाल्याची माहिती दिली.
शिवसेना नेते संजय राऊत यांना ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याबाबत याआधी समन्स पाठविण्यात आले होते. त्यावेळी ते उपस्थित न राहता, त्यांचे वकील न्यायालयात गेले होते. त्यांनी यावेळी मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. मात्र, ईडीने 1 जुलैचे समन्स पाठवले होते. त्यानुसार आज दुपारी 12 वाजता संजय राऊतांची ईडी चौकशी होणार आहे. पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी राऊतांना ईडीची नोटीस आली आहे. कालच संजय राऊतांनी आपण कोणत्याही कारवाईला सामोरं जाण्यास तयार असल्याचं म्हटले होते.
तसेच ईडीला सर्व सहकार्य करणार असून, शिवसैनिक ईडी कार्यालय गर्दी करू नये, सहकार्य करावे, असे आवाहन राऊतांनी केले आहे. यावेळी काळजी करु नका म्हणत राऊतांनी उद्धव ठाकरे, शरद पवार, ममता बॅनर्जी आणि राहुल गांधींना ट्विट टॅग केले आहे.
ईडीच्या नोटीसवर संजय राऊत पहिल्यांदाच हजर झाले नाहीत. त्याने ईडीकडे हजर राहण्यासाठी 14 दिवसांचा अवधी मागितला होता. मात्र, ईडीने ते मान्य न करता दुसरी नोटीस बजावली, त्यानंतर आज संजय राऊत हजर राहणार आहेत.
I will be appearing bfore the ED tody at 12 noon. I respect the Summons issued to me and it's my duty to co-operate with the Investigation agencies
I appeal Shivsena workers not to gather at the ED office
Don't worry !@PawarSpeaks @OfficeofUT @MamataOfficial @RahulGandhi pic.twitter.com/Vn6SeedAoU
— Sanjay Raut (@rautsanjay61) July 1, 2022
डीएचएफएल, येस बँक प्रकरणात ईडीने सोमवारी पुण्यातील उद्योजक अविनाश भोसले यांना ताब्यात घेतले होते. या प्रकरणी ईडीला राऊत यांचीही चौकशी करायची होती, असा दावा सूत्रांनी केला होता. त्यांचे पत्राचाळ प्रकरण देखील DHFL प्रकरणाशी संबंधित होते.
ईडीचे समन्स प्राप्त झाल्यानंतर लगेचच, संजय राऊत यांनी ट्विटरवर आरोप केला की केंद्राच्या सूचनेनुसार आपला छळ केला जात आहे. एप्रिलमध्ये ईडीने जमीन घोटाळ्याप्रकरणी राऊत यांच्याशी संबंधित मालमत्ता जप्त केल्या होत्या.