Sanjay Raut : बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार म्हणणारे ढोंगी - संजय राऊत

Sanjay Raut on Shinde Group : बाळासाहेबांच्या विचारांची (Balasaheb Thackeray) मशाल ही निष्ठावंतांकडेच आहे. (Maharashtra Political News) बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार म्हणणारे ढोंगी असा निशाणा खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर साधला आहे. 

Updated: Nov 17, 2022, 01:42 PM IST
Sanjay Raut : बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार म्हणणारे ढोंगी - संजय राऊत title=

Sanjay Raut on Eknath Shinde and BJP  : बाळासाहेबांच्या विचारांची (Balasaheb Thackeray) मशाल ही निष्ठावंतांकडेच आहे. (Maharashtra Political News) बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार म्हणणारे ढोंगी असून, त्यांचा ढोंगीपणा जास्तकाळ टिकणार नाही, असा हल्लाबोल ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासादर संजय राऊतांनी (Sanjay Raut) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर (Eknath Shinde) केलाय. बाळासाहेब तसेच सावरकरांना भारतरत्न द्या, सावरकरांवर ढोंगी प्रेम दाखवू नका, असं म्हणत भाजपवरही राऊतांनी निशाणा साधला.

'तोतये फारकाळ टिकणार नाहीत'

राऊत पुढे म्हणाले, बाळासाहेबांच्या नावाने निर्माण झालेल तोतये फारकाळ टिकणार नाहीत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतीदिन आहे. यानिमित्ताने पत्रकारांशी बोलताना शिवसेना (Uddhav Balasaheb Thackeray) नेते, खासदार संजय राऊत यांनी शिवसेनाप्रमुखांच्या विचारांना उजाळा दिला. तसेच बाळासाहेबांच्या नावाने जे ढोंगी निर्माण होताहेत ते फारकाळ टिकणार नाहीत, असा हल्लाबोल चढवला. (अधिक वाचा - संजय राऊत यांची एकनाथ शिंदे गटावर जोरदार टीका)

'बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार म्हणणारे ढोंगी...'

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कालच बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी जाऊन दर्शन घेतले. त्यावेळी त्यांनी हे बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार असल्याचं म्हटलं. यावरून राऊतांनी शिंदेवर निशाणा साधला. बाळासाहेबांच्या विचारांची मशाल ही निष्ठावंतांकडेच आहे. बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार म्हणणारे ढोंगी असून, त्यांचा ढोंगीपणा जास्तकाळ टिकणार नाही, असा घणाघात संजय राऊतांनी केला.

‘बाळासाहेबांचं स्मरण गेल्या 10 वर्षामध्ये रोज होत राहिले. क्षणोक्षणी होत राहिलं. महाराष्ट्र आणि देशात त्यांनी जे कार्य करून ठेवलं आहे त्यामुळे देशाला त्यांचं स्मरण होत राहिल. शिवसेनेची स्थापना ही बाळासाहेबांच्या जीवनातील एक म्हत्त्वाची घटना. अनेक घाव झेलूनही शिवसेना उभी आहे. ते असतानाही पाठीत वार झाले, ते नसतानाही झाले. मी त्यांच्यासोबत प्रदीर्घ काम केलं आहे, असे ते म्हणाले. याबाबत त्यांनी फोटोही ट्विट केला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी भावुक पोस्ट केली. हे नाते खूप जुने आहे, असे म्हणत बाळासाहेबांना विनम्र अभिवादन केले आहे.

शिवसेनेच्या माध्यामातून काम केले. ते उत्तम व्यंगचित्रकार, वक्ते नेते होते. महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या जनतेची नाडी ओळखणारे लोकनेते होते. आजही आम्ही सगळे बाळासाहेबांच्या विचारांनाच प्राधान्य घेऊनच चालत आहोत. कुणी कितीही टीका केली तरी बाळासाहेबांच्या विचारांची मशाल ती फक्त निष्ठावंतांच्याच हातात असू शकते. कारण त्यांच्या राजकीय जीवनात त्यांनी निष्ठा आणि अस्मिता यांनी जे महत्त्व प्राप्त करून दिलं त्याचं तेज कुणाला हिरावून घेता येणार नाही, असा टोला त्यांनी शिंदे गटाला हाणला.