मुंबई : Shiv Sena Dussehra Melawa :शिवसेनेचा दसरा मेळावा (Dussehra Melawa) आज येथील षण्मुखानंद सभागृहात होत आहे. बंदीस्त सभागृहातल्या कार्यक्रमाला असलेली मर्यादा हटवली गेली आहे. त्यामुळे हजारो शिवसैनिक उपस्थित राहू शकणार आहेत. या मेळाव्यावर शिवसेना प्रवक्ते आणि नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाष्य केले आहे. कोणती शस्त्र काढायची ते संध्याकाळी समजेलच असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे आजचे भाषण महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले. दरम्यान, ड्रग्जबाबत सरसंघचालक मोहन भागवत यांनी खरी चिंता व्यक्त आहे. मात्र, नोटबंदीवेळी केलेला दावा फोल ठरला, असे राऊत म्हणाले. (Shiv Sena Leader Sanjay Raut on Shiv Sena Dussehra Melawa )
दसरा मेळाव्याला शमीच्या झाडावरील शस्त्र काढली जातात. हे शशस्त्र कुणासाठी, कशासाठी काढली जातात हे कळेलच, असा सूचक इशारा संजय राऊत यांनी यावेळी केला. राजकारणात देशभरात लक्ष आहे. शिवतीर्थावर हा मेळावा होतो, पण कोविडमुळे हा शषण्मुखानंद सभागृहामध्ये सर्व नियमांचे पालन करून होणार आहे. शिवसेना काय करणार, काय होणार हे, समजेल. संपूर्ण देशाला जाणून घ्यायचंय की शिवसेना पक्ष प्रमुख कोणती राजकीय दिशा घेऊन पुढे जातील, असे राऊत म्हणाले.
If he says something, it has significance, but if narcotics' money is being used against nation, who is heading the govt?...The PM had said that money to terrorists, drugs mafia will stop with demonetisation..: Shiv Sena's Sanjay Raut on RSS chief Mohan Bhagwat 'narcotics' remark pic.twitter.com/Hc2w1cXp2j
— ANI (@ANI) October 15, 2021
सरसंघचालक भागत बरोबर आहेत. ते मुद्दे देशासमोर ठेवत असतील तर हा मुद्दा महत्वाचा आहे. अंमली पदार्थांचा पैसा जर देशविघातक कारवायांसाठी वापरला जातोय तर केंद्र सरकार काय करत आहे, असा त्यांनी सवाल उपस्थित केला. नोटबंदीनंतरही जर देशविघातक कारवाया या बंद होत नसेल तर हा चिंतेचा विषय आहे. बनावट नोटा आणि ड्रग्जमुळे दशशतवाद्यांना पैसा मिळतो असं ते म्हणाले.
प्रखर राष्ट्रवादी, हिंदूवादी सरकार आहे. तरी जर अशा कारवाया होत असतील तर हा चिंतेचा विषय आहे. आज विजयादशमी, शुभ बोलले पाहीजे. 2024ला सगळं काही स्पष्ट होईल. शिवसेना 2024ला राष्ट्रीय राजकारणात केंद्र स्थानी असेल. राष्ट्रीय राजकारणात सक्रीय असेल. देशात शिवसेनेचे 22 खासदार येत्या काही दिवसात पाहायला मिळतील. दादरा नगर हवेलीचा खासदारही शिवसेनेचा असेल, असा दावा राऊत यांनी यावेळी केला.