ठाकरे गटाच्या रणरागिणी संजना घाडी संतप्त, AU वरुन राहुल शेवाळे यांना व्हिडिओतून प्रत्युत्तर

Sanjana Ghadi : स्वतः शिवसेनेतून मोठे झाल्यानंतर खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यावर केलेले आरोप चुकीचे आहेत, असे संजना घाडी म्हणत व्हिडिओही ट्विट केला आहे.  

Updated: Dec 24, 2022, 03:51 PM IST
ठाकरे गटाच्या रणरागिणी संजना घाडी संतप्त, AU वरुन राहुल शेवाळे यांना व्हिडिओतून प्रत्युत्तर title=

Sanjana Ghadi on Rahul Shewale : स्वतः शिवसेनेतून मोठे झाल्यानंतर खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यावर केलेले आरोप चुकीचे आहेत. जो व्यक्ती आपल्या बायकोशी प्रामाणिक राहू शकत नाही तो व्यक्ती सामान्य जनतेशी काय प्रामाणिक राहणार,असा सवाल शिवसेनेच्या नेत्या संजना घाडी यांनी केला आहे. दित्य यांच्यावर केलेल्या घृणास्पद टिकेबद्दल त्यांचा जाहीर निषेध आहे. आणि स्वतःवर बलात्काराचा आरोप असताना दुसऱ्यांवर ताशेरे ओढणं सोडून द्या, असा हल्लाबोल संजना घाडी यांनी केला आहे. याबाबत त्यांनी व्हिडिओही ट्विट केला आहे. AU वरुन त्यांनी राहुल शेवाळे यांनाहा व्हिडिओ पाहावा, असे थेट आव्हान दिले. 

आपल्या बायकोशी प्रामाणिक राहू शकत नाही तो व्यक्ती ...

बायकोशी प्रामाणिक नाही, तो जनतेशी काय असणार? स्वत:च बलात्काराचा आरोप असणारे आरोपी आहात आपण. आपल्याला काय अधिकार? बंडखोर, गद्दार राहुल शेवाळे यांनी आदित्य ठाकरे यांच्या चारित्र्यावर आरोप केलाय. आदित्य ठाकरे यांनी दोन दिवस बेकायदा सरकारची कोंडी केलेली आहे. शिंदे आणि फडणवीस यांचे मिंध झालेलं सरकार. ज्या ठिकाणी महाराष्ट्राच्या सन्मानस्थानांचा अपमान असो. महाराष्ट्राचे लचके तोडण्याचा कर्नाटक सरकारचा प्रयत्न असो. काही उद्योगधंदे गुजरात आणि महाराष्ट्राच्या बाहेर गेलेले आहेत. ते पाठविण्याचे कटकारस्थान असो. त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांनी केलेला जमीन घोटाळा असो. या सगळ्या गोष्टींचा समाचार आदित्य घेत आहेत. राहुल शेवाळे यांनी खासदारकीचा उपयोग करुन पवित्र संसदेत आदित्य यांच्याबाबत अफावांची राळ उठवली आहे. शिवसेनेने सामान्य नगरसेवकापासून खासदार बनवले. तसेच जो व्यक्ती आपल्या बायकोशी प्रामाणिक राहू शकत नाही तो व्यक्ती सामान्य जनतेशी काय प्रामाणिक राहणार,असा सवाल संजना घाडी यांनी केला आहे. (हेही बातमी वाचा - रिया चक्रवर्तीला A U नावानं फोन कुणी केला?; A U चे नाव आले समोर )

‘AU’ नावाने 44 वेळा फोन...

दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूपूर्वी रिया चक्रवर्तीला ‘AU’ नावाने 44 वेळा फोन आले. ‘AU’चा अर्थ आदित्य उद्धव ठाकरे असा होतो, असा गौप्यस्फोट संसदेत शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी केला. शेवाळे यांच्या गंभीर आरोपानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींनी राहुल शेवाळे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनीही आदित्य ठाकरे यांच्यावरील आरोप फेटाळून लावले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घोटाळा लपविण्यासाठी हे आरोप करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. दिशाभूल करुन मुख्यमंत्र्यांवरील आरोपाचा मुद्दा बाजुला करण्याचा प्रकार आहे. तर खुद्द आदित्य ठाकरे यांनीही 32 वर्षांच्या तरुणाला हे सरकार घाबरत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे असे चुकीचे आरोप करण्यात येत आहेत, असे राऊत म्हणाले.

खासदार प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या, या लोकांनी गद्दारी केली आहे, ते संसदेतील गद्दार सदस्य आहेत, यांचा लवकरच संसदेतील अंत होणार आहे, कारण भाजपादेखील कंटाळून यांना सोडणार आहे. चार दिन की चांदणी फिर अंधेरी रात… असे त्या म्हणाल्यात.

राहुल शेवाळे यांच्यावर हल्लाबोल करताना चंद्रकांत खैरे म्हणाले की, खासदार राहुल शेवाळे यांची अनेक लफडी आहेत. ते एका महिलेला परदेशात घेऊन गेले होते. त्यावेळी शेवाळे यांची पत्नी रडत रडत उद्धव ठाकरे यांच्याकडे आली होती. तेव्हा त्यांची भानगड उद्धव ठाकरे यांनी मिटवली होती.