संदीप पाटील यांची मुंबई क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीतून माघार

माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांनी काही परस्पर हितसंबंधांच्या मुद्द्यावरून मुंबई क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीतू

Updated: Oct 1, 2019, 11:46 AM IST
संदीप पाटील यांची मुंबई क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीतून माघार title=

मुंबई : माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांनी काही परस्पर हितसंबंधांच्या मुद्द्यावरून मुंबई क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे. यामुळे विजय पाटील यांची एमसीएच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड निश्चित मानली जात आहे. बाळ महादळकर गटाकडून संदीप पाटील यांच्यासमोर अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यासाठी प्रस्ताव ठेवण्यात आला होता. 

संदीप पाटील हे समालोचनही करतात. यामुळे काही तांत्रिक बाबींची पूर्तता करणं गरजेचं होतं. यामुळे संदीप पाटील यांनी या निवडणुकीतूनच माघार घेतली आहे. 

बाळ महाडदळकर गटातील संभाव्य उमेदवार पुढीलप्रमाणे : उपाध्यक्ष - अमोल काळे, सेक्रेटरी - संजय नाईक, खजिनदार - मयांक खांडवाला, सहसचिव - जगदीश आचरेकर, कमिटी मेंबर - नदीम मेमन, लक्ष्मण चव्हाण, अजिंक्य नाईक, गौरव पय्याडे, खोदादार इराणी, अभय हडप, विहंग सरनाईक, नील सावंत, सुरेंद्र शेवाळे