मोठी बातमी! समीर वानखेडे यांना आर्यन खान प्रकरणातून हटवलं

आर्यन खान आणि नवाब मलिक यांचे जावई समीर खानसह एकूण 6 गुन्ह्यांच्या तपासासाठी दिल्लीतून अधिकारी येणार 

Updated: Nov 5, 2021, 08:04 PM IST
मोठी बातमी!  समीर वानखेडे यांना आर्यन खान प्रकरणातून हटवलं  title=

मुंबई : मुंबई ड्रग्स प्रकरणात (Mumbai Drug Case) मोठी बातमी आली आहे. मुंबई ड्रग्स प्रकरणात तपास करणाऱ्या एनसीबीचे Zonal Director समीर वानखेडे यांना हाय प्रोफाईल आर्यन खान (Aryan Khan) प्रकरणातून हटवण्यात आलं आहे. तपास निष्पक्ष होण्यासाठी समीर वानखेड़े यांना हटवण्यात आल्याचं बोललं जात आहे. 

आर्यन खानप्रकरणासहित सहा प्रकरणांच्या चौकशीचे अधिकार समीर वानखेडे यांच्या कडून काढण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास आता दिल्ली एनसीबीकडून केला जाईल. संजय सिंह हे या तपासकामाचे प्रमुख असतील. या प्रकरणात नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्या प्रकरणाचाही समावेश आहे. या प्रकरणांचा तपास आता संजय सिंह यांच्याकडे देण्यात आली आहे. हा प्रशासकीय निर्णय असल्याचं NCB चे पश्चिम विभागीय उप महासंचालक मुथा अशोक जैन यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, आपणाला तपासातून हटवण्यात आलेलं नाही.तर माझ्याच मागणीवरून हा तपास दिल्ली NCB टीमकडं सोपवण्यात आलाय, अशी प्रतिक्रिया समीर वानखेडे यांनी दिली आहे.

 नवाब मलिक यांचं ट्विट

समीर वानखेडे यांना हटवण्यात आल्याच्या बातमीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी सूचक ट्विट केलं आहे. आर्यन खानसह 5 प्रकरणं समीर वानखेडे यांच्याकडून काढली, आणखी तपास व्हायला हवा, अशी 26 प्रकरणं आहेत. ही तर फक्त सुरुवात आहे, यंत्रणा सुधारण्यासाठी आणखी बरंच काही करावं लागेल, असं ट्विट नवाब मलिक यांनी केलं आहे.

मुंबई ड्रग्स प्रकरण

2 ऑक्टोबरला मुंबईतील एका क्रुझवर छापा टाकत एनसीबीने 8 जणांना अटक केली होती. यात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानलाही अटक करण्यात आली होती. यानंतर 27 ऑक्टोबरपर्यंत आर्यन खानला तुरुंगात राहवं लागलं होतं. 27 ऑक्टोबरला आर्यन खानला जामीन मंजुर करण्यात आला.

नवाब मलिक यांचे सातत्याने आरोप

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर आरोपांची मालिकाच सुरु केली होती. मुंबई क्रुझवरील कारवाई बनाव असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. तसंच समीर वानखेडे यांच्या जातप्रमाणपत्रावरुन, पहिल्या लग्नावरुन इतकंच काय तर समीर वानखेडे यांच्य महागड्या शर्ट-पँटवरुनही नवाब मलिक यांनी सातत्याने आरोप सुरु ठेवले होते. तसंचर या प्रकरणातील पंच प्रभाकर साईल यानेही समीर वानखेडे यांच्यावर पैसे मागितल्याचा आरोप केला होता. यानतंर एनसीबीने हे पाऊल उचललं आहे.