प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट मॉडेलची मुंबईत यशस्वी अंमलबजावणी

एचयूएल आणि यूनएडीपी चा संयुक्त उपक्रम 

Updated: Sep 11, 2020, 06:59 PM IST
प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट मॉडेलची मुंबईत यशस्वी अंमलबजावणी  title=

मुंबई :  प्लास्टिकच्या कचर्‍याचे व्यवस्थापन करण्याच्या गरजेवर मात करण्यासाठी हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड (एचयूएल) ने युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम (यूएनडीपी) बरोबर भागिदारी केली असून याचा लाभ आता प्लास्टिक वेस्ट मटेरिअल रिकव्हरी मॉडेलच्या माध्यमातून मुंबईतील के पूर्व, एच पश्चिम, आणि आर उत्तर या तीन वॉर्डातील ३३ हजारां हून अधिक घरांचा समावेश सध्या करण्यात येत असून येत्या काही वर्षांत हे मॉडेल आता अधिक घरांतही राबवण्यात येणार आहे.

तंत्रज्ञानावर आधारीत असे हे मॉडेल असून यामुळे सर्व प्रकारच्या प्लास्टिकच्या कचर्‍याचे वर्गिकरण आणि पुर्नवापर मुल्यशृंखले नुसार करून यामुळे कार्यक्षम आणि सर्क्युलर अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकेल.   या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) आणि स्वच्छ पारले अभियान सारख्या  नागरिकांच्या संघटनांची मदत घेण्यात येत आहे,  या संस्थांनी प्लास्टिकचा कचरा जागेवरच वर्गिकृत करण्यासाठी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यावर जोर दिला होता. 

या कार्यक्रमामुळे आजमितीस २५०० टन प्लास्टिकचा कोरडा कचरा गोळा होण्यास मदत झाली.  या उपक्रमाला सहकार्य करण्यासाठी ५०० हून अधिक सफाई साथी (कचरावेचक) यांची मदत मिळाली. हे मॉडेल किती यशस्वी आहे याची माहिती देण्यासाठी एचयूएल कडून मुंबईतील प्लास्टिक कचरा व्यवस्थापना विषयी व्हर्च्युअल राऊंड टेबल चे आयोजन यूएनडीपी आणि मुंबई महानगरपालिका (एमसीजीएम) यांच्या सहकार्‍यातून करण्यात आले होते.

या राऊंडटेबल मध्ये एचयूएल-यूएनडीपी च्या भा‍गिदारी तून कशापध्दतीने हे मॉडेल कार्य करते त्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले व या माध्यमातून कोरडा कचरा जमा करून तो जागेवरच कशा प्रकारे वेगळा करावा यावर लक्ष केंद्रित करून त्याचा प्रसार कसा करावा याबाबत माहिती देण्यात आली. या प्रकल्पाच्या माध्यमातून एचयूएल आणि यूएनडीपी कडून सफाई साथी असलेल्या लोकांचे आरोग्य आणि वित्तीय सक्षमते साठीही प्रयत्न केले जातात.   हा प्रकल्प भारत सरकारच्या स्वच्छ भारत (क्लीन इंडिया) मिशन, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रूल्स २०१६ आणि प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट (ॲमेंडमेंट) रूल्स २०१८ नुसार अंमलात आणण्यात आला आहे.