मुंबई : मनसुख हिरेन हत्या प्रकरणात रहस्यमयरित्या वळण घेत आहे. दररोज नवनविन खुलासे होत आहेत. मनसुख हिरेनच्या हत्येवेळी तिथे 3 ते 4 लोकं उपस्थित होते. अशी मोठी अपडेट समोर आली आहे.
मनसुख हिरेनला घोडबंदर रोड येथे घेऊन जाण्याचे सांगून ठाणे रेती बंदर येथे नेण्यात आले. येथे हिरेन याने सचिन वाझेकडे नाराजी व्यक्त केली. ही नाराजी तुरूंगात जाण्याच्या विषयावरून होती. यानंतर मनसुखला क्लोरोफार्म देऊन बेशुद्ध करण्यात आले. त्यांनी ओरडू नये आणि त्यांना दुखापत होऊन रक्त येऊ नये म्हणून त्यांच्या तोंडात 4 हातरुमाल कोंबण्यात आले. या हातरुमालांची फॉरेन्सिक चौकशी सुरू आहे. हे 4 वेगवेगळे रुमाल आता रहस्य बनले आहेत.
मनसुख हिरेनचा मृत्यू गळा दाबल्याने गुदमरून झाला आणि तसेच त्यांचा मृतदेह खाडीमध्ये फेकून देण्यात आला. ATS च्या सुत्रांच्या आधारे मिळालेल्या माहितीनुसार मनसुखला ठाणे खाडी येथे नेण्यात आले. कारमध्येच त्याच्या तोंडात रुमाल कोंबून तसेच गळा दाबून मारण्यात आले. यावेळी क्लोरोफॉर्मचा वापर करण्यात आला होता. यावेळी वाझे हे घटनास्थळाजवळ कारमध्ये बसलेले होते.
हिरेनच्या हत्येवेळी वाझे डोंगरी येथील टीप्सी बारमध्ये रेड करत होते. असा बनाव रचन्यात आला. परंतु हिरेनच्या हत्येवेळी ते घटनास्थळी उपस्थित राहून कारमध्येच असल्याची माहिती समोर आली आहे
--------
ठाणेच्या घोडबंदर परिसरातून निघाल्यानंतर सचिन वाझेने मोठ्या चालाखीने सर्वात आधी मुंबई पोलीस मुख्यालय गाठले. तेथून सीआययू येथील आपल्या ऑफिस मध्ये गेले. तिथे आपला मोबाईल चार्जिंग लावला. जेणेकरून त्यांचे लोकेशन पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात दिसायला हवे. हत्य
सचिन वाझे यांनी ATS ला आपले स्टेटमेंट देतांना म्हटले की, 4 मार्चला ते पूर्ण दिवस मुंबई पोलीस मुख्यालयाच्या सीआययु ऑफिसमध्ये होते. परंतु त्यांच्या मोबाईल लोकेशनच्या माहितीनुसार ते दुपारी 12.48 मिनिटांनी चेंबुरच्या MMRDA कॉलनीमध्ये होते. याचा अर्थ सचिन वाझे यांनी हिरेनेच्या हत्येचा तपास झाल्यास तो भरकटवण्यासाठी पूर्ण प्लॅन तयार ठेवला होता.