मुंबई : Sachin Sawant on Parambir Singh : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) परमबीर सिंह (Param Bir Singh) प्रकरणाचा तपास आता सीबीआय करेल, असा निर्णय दिला. (Supreme Court orders probe against Param Bir be transferred to CBI) याबाबत काँग्रेसचे नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. हल्ली न्यायालयाकडून येणारे निर्णय आमच्या समजण्या पलिकडचे आहेत, असे म्हटलंय.
आश्चर्य व्यक्त करण्यापेक्षा आमच्याकडे दुसरा काही पर्याय नाही. न्याय व्यवस्थेला म्हणायचे आहे का, राज्यातील तपास यंत्रणा असक्षम आहेत? त्या सगळ्या मोडीत काढायच्या आहेत का? केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. हल्ली कोर्टकडून येणारे निर्णय आमच्या समजेच्या पलीकडचे आहेत, असे सचिन सावंत म्हणाले.
2014च्या आधी अगोदर जे निर्णय यायचे. जो काही कोष होता. आणि आता म्हणजेच 2014 नंतरचे जे निर्णय येत आहेत, ते आमच्या समजण्या पलिकडचे, असे सचिन सावंत म्हणाले. राज्यातील तपास यंत्रणावर विश्वास ठेवायचा नाही. या संस्था मोडीत काढण्याचा प्रकार नाही ना, असे वाटत आहे. सीबीआय यंत्रणेकडून तपास याआधी करण्यात आला. आर्यन खान प्रकरणात काय निघाले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
परमबीर सिंह (Param Bir Singh) यांना जे संरक्षण मिळत आहे. त्यावरुन स्पष्टच होत आहे. त्यांना अनेक महिन्यांपासून संरक्षण मिळत आहे. त्यांना एवढे संरक्षण कसे काय मिळू शकते, याबाबत आश्चर्य आहे. न्याय व्यवस्थेच्या माध्यमातून एवढे संरक्षण कसे मिळू शकते, हा अभ्याचा विषय आहे. अॅटेलिया प्रकरणाचा तपास एनआयएकडून करण्यात येत होता. चार्चशीटमध्ये असे आलेले आहे की, परमबीर सिंह यांनी स्वत:च्या खिशातील पैसे टाकून त्या ठिकाणी दहशतवादी संघटना आहे. तिच्या नावाने धमकी दिली, असे चार्चशीटमध्ये आहे. तरीही गुन्हेगारांत त्यांचे नाव नाही, याचे आश्चर्य वाटत आहे, असे ते म्हणाले.
या निकालाचा अभ्यास जास्त करावा लागेल. कायद्याच्या विद्यार्थ्यांनाही आता येणाऱ्या निकालांचा अभ्यास करावा लागणार आहे. आताचा काळात केंद्रीय तपास कसा वापर केला जात आहे, हे आपण पाहत आहोत. केंद्रीय तपास यंत्रणाचा वापर हा सरळ सरळ राजकीय अस्त्र म्हणून वापर केला जात आहे. आपण पाहिले असेल की गेल्या आठ वर्षात छापे मारले, हे लोकसभेत दिलेल्या उत्तरात दिसून येत आहे. सरळ सरळ दिसून येत आहे हा राजकीय वापर येत आहे. विरोधी नेत्यांवर धाड टाकण्यात येत आहे. मात्र, भाजपच्या एकाही नेत्यावर धाड पडत नाही. म्हणजेच हा वापर राजकीय आहे. त्यामुळे न्याय मिळेल, अशी अपेक्षा बाळगणे हे चुकीचे ठरेल, असे सचिन सावंत म्हणाले.