सरकार पाडण्याच्या अफवा उठवल्या गेल्या - अजित पवार

सर्वांना सोबत घेऊन समर्थ महाराष्ट्र (Maharashtra) घडविणार आहोत. विकासासाठी सरकार कटिबद्ध आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.

Updated: Dec 3, 2020, 06:04 PM IST
सरकार पाडण्याच्या अफवा उठवल्या गेल्या - अजित पवार title=
संग्रहित छाया

मुंबई : सर्वांना सोबत घेऊन समर्थ महाराष्ट्र (Maharashtra) घडविणार आहोत. विकासासाठी सरकार कटिबद्ध आहे. यावर्षात अनेक संकटे आलीत. कमी पैशात चांगले काम केले आहे. महाविकास आघाडी सरकार ( Mahavikas Aghadi government) पाडण्याच्या अफवा (Rumors) उठविण्यात आल्यात.  कितीही ज्योतिषी येऊ द्या, सरकार भक्कम आहे. अनेकांना गाजर दाखविण्याचा प्रयत्न झाला. समान कार्यक्रम हा समान धागा आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.

महाविकास आघाडी सरकारला वर्षपूर्ती झाली. यानिमित्ताने 'महाराष्ट्र थांबला नाही आणि थांबणारही नाही' या कामकाज पुस्तकाचे प्रकाशन राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले. यावेळी अजित पवार यांनी जोरदार टोलेबाजी करत विरोधकांवर हल्लाबोल चढवला.  वेगळ्या अफवा पसरवल्या जात होत्या. गाजर दाखवण्याचा प्रयत्न झाला. विरोधकांनी आटापिटा केला. पण काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे सरकार चालवण्याचे जोपर्यंत ठरवले आहे तोपर्यंत या सरकारला काहीही होणार नाही, असे ठणकावून सांगितले. 

कोरोनाचे संकट होते. अडचणी खूप आल्यात. आपल्या सरकारने चांगले काम केले आहे. आपण कुठेही कमी पडत नव्हतो. आपण या संकटाला चांगल्या पद्धतीने सामोरे गेलो याची नोंद होईल. या सरकारने राज्यातील जनतेचे हीत पाहिले आहे. जनतेच्या विकासासाठी हे सरकार बांधिल आहे, असे ते म्हणाले.

पहिला अर्थसंकल्प ४.५ लाख कोटीचा देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, काही गोष्टी राहिल्या आहेत. दोन लाखाच्या वरच्यांना कर्जमाफी देता आलेली नाही, ती राहिली आहे. नियमित कर्ज भरणार्‍या दिलासा देता आलेला नाही, अशी खंत व्यक्त केली. पैशाचं सोंग करता येत नाही. आज केंद्राकडून जीएसटीचे २८ हजार कोटी रुपये यायचे आहेत, असे अजित पवार यांनी सांगितले.