अंधेरीत एकमजली इमारतीचे छत कोसळले

दुर्घटनेत 2 जणांना बाहेर काढण्यात आलं असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Updated: Jul 16, 2020, 10:55 PM IST
अंधेरीत एकमजली इमारतीचे छत कोसळले title=

मुंबई : अंधेरी मरोळ येथील बंदरवाडा येथे इक्बाल मंझील या एकमजली इमारतीचं छत कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत 2 जणांना बाहेर काढण्यात आलं असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर 2 वयस्कर लोक पहिल्या मजल्यावर अडकले असल्याची माहिती मिळत आहे. सायंकाळीच्या सुमारास ही दुर्घटना घडली. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं असून मदतकार्य सुरु आहे. 

गुरुवारी आणखी दोन ठिकाणी इमारत, घर कोसळल्याची दुर्घटना घडली. फोर्टमध्ये जीपीओ पोस्ट ऑफिससमोर पाच मजली भानुशाली इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली. यात आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू झाला असून 6 जण जखमी झाले आहेत. जखमींना जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आतापर्यंत 13 जणांना इमारतीतून सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे. अद्यापही काही जण ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरु आहे.

Bhanushali building collapses : आम्हाला बाहेर काढा; नागरिकांची विनवणी

दुसरीकडे, पावसाच्या तडाख्याने मालाडमध्ये एक दुमजली घर कोसळलं. मालाडच्या नुरी मस्जिदजवळ, दुपारी अडीच वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली.