मुंबई: माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ विजयसिंह मोहिते-पाटील यांचे चिरंजीव रणजिंतसिंह मोहिते-पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी खोचक भाषेत निशाणा साधला आहे. भाजपमध्ये सध्या इतर पक्षांतील नाराज नेते प्रवेश करत आहेत. ही म्हणजे आचारसंहितेच्या काळातील 'मुख्यमंत्री आयात उमेदवार पवित्र करणे योजना' असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे. कालपर्यंत असणारी विचारधारा आणि राजकीय आरोप एका क्षणात नष्ट करत व्यक्तीला पवित्र करून आपल्या पक्षात घेण्यासाठी ही स्कीम सुरु करण्यात आल्याची टीका रोहित पवार यांनी केली आहे.
ब्लॉग : नेमकं कुठे बिघडलं पवारांचं गणित?
काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पूत्र सुजय विखे-पाटील यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला होता. यानंतर गिरीश महाजन यांनी आम्ही मुलेच नाही तर नातवंडेही पळवू, असे वक्तव्य केले होते. याचा अर्थ इतकाच की भाजपला सामान्यांच्या प्रश्नांशी काही देणेघेणे नसून फक्त गटातटाच्या राजकारणात रस असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.
पार्थ पवार पहिल्याच भाषणामुळे झाले ट्रोल
सुजय विखे-पाटील यांच्यापाठोपाठ रणजिंतसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने अहमदनगर आणि माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपची बाजू आणखी भक्कम झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रातही या सगळ्याचा फटका आघाडीला बसू शकतो.