नीरज चोपडाचा मुंबईच्या राणीला लांबूनच नमस्कार, एकदा हा व्हिडीओ पाहाच

नीरज चोपडानं ना दिली जादूची झप्पी...उलट संस्कारी उत्तरानं RJ मलिष्काची बंद केली बोलती, एकदा हा व्हिडीओ पाहाच 

Updated: Sep 6, 2021, 07:31 PM IST
 नीरज चोपडाचा मुंबईच्या राणीला लांबूनच नमस्कार, एकदा हा व्हिडीओ पाहाच title=

मुंबई: 13 वर्षांनंतर भारताला पुन्हा एकदा टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या नीरज चोपडाचं जगभरात कौतुक होत आहे. त्याच वेळी दुसरीकडे नीरजची मुलाखत घेण्याच्या निमित्तानं आरजे मलिष्का जे वागली त्यावरून तिला ट्रोल करण्यात आलं आहे. मुलाखती दरम्यान तिने नीरजसोबत जे केलं त्यामुळे सोशल मीडियावर तिला खूप ट्रोल केलं जात आहे. 

मलिष्काने यावेळी नीरजशी ऑनलाइन संवाद साधत असताना त्याच्यासमोर डान्स केला. यावेळी तिने नीरजला सॉरी मी जास्त त्रास तर नाही दिला असंही विचारलं आहे. तर मुलाखतीच्या शेवटी मलिष्काने जादू की झप्पी देण्याचा प्रकार केला. यामुळे सोशल मीडियावर ती चांगलीच ट्रोल झाली. 

मलिष्काने जरी जादू की झप्पी देण्यासाठी पूर्ण तयारी केली असली तरी नीरजने दिला तसा कोणताही प्रकार न करता दिलेलं फारच भारी होतं. मलिष्काने जादू की झप्पी दे म्हणत आपला गाल व्हिडीओ कॉलवर पुढे केला. मात्र नीरजने तिला लांबूनच नमस्कार म्हणत उत्तर दिलं.

19 ऑगस्टला मलिष्काने हा व्हिडीओ शेअर केला आहे. उडे जब जब जुल्फे तेरी गाण्यावर विचित्र डान्स करताना दिसत आहे. या डान्सवरून अनेकांनी तिला ट्रोल केलं आहे. ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्टला अशा पद्धतीनं वागवणं चुकीचं असल्याचं म्हटलं आहे.