कोरोनामुळे ३१ डिसेंबरच्या सेलिब्रेशनवर निर्बंध येण्याची शक्यता

सार्वजनिक ठिकाणी सेलिब्रेशन करता येणार नाही. 

Updated: Dec 15, 2020, 08:16 PM IST
कोरोनामुळे ३१ डिसेंबरच्या सेलिब्रेशनवर निर्बंध येण्याची शक्यता title=

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर न्यू ईयर आणि ख्रिसमससाठीची मुंबई महापालिकेची नियमावली २० तारखेपूर्वी जाहीर होणार आहे. यात ३१ डिसेंबरच्या सेलिब्रेशनवर निर्बंध येण्याची शक्यता आहे. मरीन ड्राईव्ह, सीफेस यासह इतर सार्वजनिक ठिकाणी सेलिब्रेशन करता येणार नाही. नाईट क्लब, हॉटेल्ससाठीही कडक नियम बनवले जाऊ शकतात. 

नाईट क्लब आणि हॉटेल्समध्ये नियम धाब्यावर बसवले जात असल्याचं महापालिकेच्या कारवाईत समोर आलं आहे. त्यामुळे ख्रिसमस आणि नववर्ष स्वागताला अधिक कडक नियम लागू होऊ शकतात. हॉटेल स्टाफसाठीही वेगळी नियमावली लागू होण्याची शक्यता आहे.

काही दिवसांमध्ये लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता आणत टप्प्याटप्प्यानं राज्यातील जनजीवन पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण असं असताना वाढत्या कोरोना रुग्णांचा आकडा आटोक्यात आणण्याचं आवाहनही राज्य शासनापुढं आहे. न्यू-ईयर आणि ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी अनेक लोकं घराबाहेर पडतात. या काळात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती कायम आहे. त्यामुळे सरकार यावर निर्बंध आणण्याचा विचार करत आहे.

देशात आणि राज्यात कोरोनाचे रुग्ण कमी प्रमाणात वाढत असले तरी संकट कायम आहे. त्यामुळे सरकारकडून काळजी म्हणून हा निर्णय घेतला जावू शकतो.