Republic Day : शिवाजी पार्क मैदानात ७१वा प्रजासत्ताक दिन साजरा

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ध्वजारोहण केलं.

Updated: Jan 26, 2020, 11:00 AM IST
Republic Day : शिवाजी पार्क मैदानात ७१वा प्रजासत्ताक दिन साजरा title=
फोटो सौजन्य : ANI

मुंबई : देशभरात आज ७१वा प्रजासत्ताकदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जाता आहे. शिवाजी पार्क मैदानात प्रजासत्ताक दिन साजरा झाला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ध्वजारोहण केलं. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरेही उपस्थित होत्या. दिल्लीतील संचलनात सहभागी होऊ न शकणारा महाराष्ट्राचा चित्ररथ मुंबईच्या संचलनात सादर करण्यात आला.

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथे ध्वजारोहण करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथे मध्य रेल्वेचं मुख्यालय आहे. या मुख्यालयात मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं. 

७१ व्या प्रजासत्ताकदिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज ध्वजारोहण केलं. मुंबईतील मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी हे ध्वजारोहण करण्यात आलं. आज मुंबईतील विविध विकासकामांचं लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.