विद्यार्थ्यांना दिलासा, जात पडताळणीला मुदत वाढ

विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. 

Updated: Jun 20, 2018, 03:12 PM IST
विद्यार्थ्यांना दिलासा, जात पडताळणीला मुदत वाढ title=

मुंबई : बारावीनंतर अभियांत्रिकी, मेडिकल, आर्किटेक्चर, बी फार्म या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. राज्य सरकारने जात पडताळणी संदर्भात विद्यार्थ्यांना काहीसा दिलासा दिलाय. जात पडताळणीसाठीची मुदत वाढवण्यात आली आहे. याआधी ३० जूनपर्यंत जात पडताळणीसाठी मुदत होती मात्र आता ती वाढवून १० ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आता १० ऑगस्टपर्यंत जात पडताळणीचे दाखले विद्यार्थ्यांना देता येणार आहेत.

मंत्रीमंडळने समाजकल्याण विभागाच्या कायद्यामध्ये दुरूस्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यांनी जातपडताळणीसाठी अर्ज केले नाही त्यांनी येत्या दोन दिवसात अर्ज करावे लागणार आहेत.