मुंबईतील बेकायदा पार्किंगच्या दंडात कपात, आता नवे दर लागू

मुंबई शहरातील बेकायदा पार्किंग करणाऱ्यांवर मोठा दंड आकरण्यात आला. हा दंड कमी करण्यात आला आहे.

Updated: Jan 8, 2020, 12:14 PM IST
मुंबईतील बेकायदा पार्किंगच्या दंडात कपात, आता नवे दर लागू title=

मुंबई : सध्या शहरात पार्किंग करण्यासाठी जागा नाही. त्यामुळे जिथे जागा मिळेल तिथे अनेकजण गाड्या पार्क करतात. ज्या ठिकाणी नो पार्किंग असते, त्याठिकाणी गाड्या पार्क केल्या जातात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होता. तसेच वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी आणि वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी बेकायदा पार्किंग करणाऱ्यांवर मोठा दंड आकरण्यात आला. हा दंड पाच हजार ते २३,५०० पर्यंत होता. आता हा दंड कमी करण्यात आला आहे. प्रशासनाने सुधारित दर लागू करण्यात येणार आहे. पार्किंग दराच्या ४० पट तर वर्दळीच्या मार्गांवर ८० पट दंड आकारला जाणार आहे. सध्या पार्किंग दर ४० ते १०० रुपये असून नव्या दरपत्रकानुसार दंड किमान १८०० रुपये होणारआहे.

मुंबईत बेकायदा पार्किंगमुळे वाहतुककोंडीचा मोठा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे यातून सुटका करण्यासाठी दंडाचे हत्यार बाहेर काढण्यात आले. मात्र, याला तीव्र विरोध होत असल्याने हा दंड आता कमी करण्यात आला आहे. बेकायदा पार्किंग करण्यासाठी ५ ते २३ हजरापर्यंत दंड आकारण्यात येत होता. महापालिकेच्या पार्किंग  वाहनतळापासून ५०० मीटरच्या आत पार्किंग केल्यास हा दंड वसूल केला जात आहे. मात्र, ही दंड रक्कम मोठी असल्याने अनेक वादाचे प्रसंग होत आहेत. कर्मचाऱ्यांना दंड वसूल करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. वादाचे प्रसंग रोखण्यासाठी अखेर दंड कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नवीन सुधारित पार्किंग दर

दुचाकी - आधीचा दंड ५, सुधारित दंड - १८००
तीन-चार चाकी कार - आधीचा दर १० हजरा, सुधारित दंड ४ हजार
ऑटो, टॅक्सी - आधी ८ हजार आता ४ हजार
सार्वजनिक वाहतूक बस - सात हजार आहे, तोच काय आहे.
अवजड वाहने, ट्रॅक - आधी १५ हजार आता नवा दर १० हजार रुपये.

दरम्यान, काही नगरसेवकांनी पार्किंगच्या दंड कमी करण्याची मागणी केली होती. तसे पत्र प्रशासनाला दिले होते. मुंबईकरांना नाहक भुर्दंड कशाला, असा प्रश्न उपस्थित केला होता.