मुंबई : मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज मुंबईतील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. मुंबई महापालिकेतल्या अधिकाऱ्यांबरोबर त्यांनी चर्चा केली. यानंतर त्यांनी पत्रकारांना याबाबतची माहिती दिली
काय म्हणाले आदित्य ठाकरे
15 ते 18 वर्षातील मुलांसाठी लसीकरण सुरु करण्यात आलं आहे. त्याचा आढावा घेतला, याच आठवड्यात काही शाळा आणि कॉलेजबरोबर व्हिसी घेऊन लगेचच लसीकरण कसं सुरु करता येईल यावर उपाययोजना करणार आहोत.
3 तारखेपासून लसीकरण सुरु करण्याचा मानस आहे. तसंच बूस्टर डोससाठी ज्यांचे लसीचे दोन डोस झाले आहेत त्याच्या नऊ महिन्यानंतर लस घेणं गरजेचं आहे. किती आरोग्य कर्मचारी आहेत, किती फ्रंटलाईन वर्कर्स आहेत, किती 60 वर्षांवरील लोकं आहेत, याची यादी आम्ही काढत आहोत, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
तर बिल्डिंग सील होईल
कोरोनाच्या केसेस वाढत असल्या तरी पॅनिक होण्याची गरज नाही, पण टेस्ट आणि ट्रेस करत राहाणं, डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे. एखाद्या बिल्डिंगमध्ये 10 हून जास्त केसेस आढळल्या तर ती बिल्डिंग सील केली जाईल.
व्हॉट्सअॅपपेक्षा डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा
सध्या आपल्याकडे 54 हजार बेड्स आहेत. कुठेही हलगर्जी करणं चुकीचं राहिल, ओमायक्रॉन घातक आहे की सौम्य आहे व्हॉट्सअॅ्पवर फिरवलं जात आहे. पण हे सर्व डॉक्टरवर सोडलं पाहिजे. ज्या पद्धतीने पुन्हा केसेस वाढत आहेत, ते पाहता, काळजी घेणं, मास्क लावणं, व्हॅक्सिन घेतलं नसेल तर ते घेणं, गरजेचं आहे.
सार्वजनिक पार्ट्यांवर निर्बंध
31 तारखेला पब्लिक प्लेसेस बंद राहतील, पार्टी किंवा सेलेब्रेशनला परवानगी देण्यात येणार नाही. रेस्टॉरंटमध्ये काळजी घेणं गरजेचं आहे. 25 ट्केक किंवा 50 टक्क्यांचे निर्बंध लावण्यात आलेले आहेत, ते पाळले नाहीत तर भरारी पथक किंवा सीसीटीव्हीचं फुटेज पाहून कारवाई केली जाईल. पुढचे काही महिने सील केले जातील. कठोर कारवाई केली जाईल.
शाळा बंद करण्याबाबत तूर्तास निर्णय नाही
मागच्या महिन्या कोरोना केसेस 150 च्या आसपास होत्या ते आता अडीच हजारांपर्यंत पोहल्या आहेत. ही तिसऱ्या लाटेची सुरुवात असू शकते. घाबरण्याची गरज नाही, पण काळजी घेतली पाहिजे. शाळा, कॉलेज बंद करण्याबाबत अजून काहीही निर्णय घेतलेला नाही. पण गरज पडली तर पुढच्या आठवड्यात निर्णय घेऊ.