राऊत - सोमैया वाद : असं कुठं होतं का, ज्याच्यावर आरोप तोच म्हणतोय की...

संजय राऊत आणि किरीट सोमैया यांची एकमेकांवरील आरोपांची मालिका काही संपता संपत नाही. यातच...  

Updated: Apr 17, 2022, 10:31 AM IST
राऊत - सोमैया वाद : असं कुठं होतं का, ज्याच्यावर आरोप तोच म्हणतोय की...  title=

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी भाजप नेते किरीट सोमैया ( Kirit Somaiya ) यांच्यावर 'टॉयलेट' घोटाळ्याचा आरोप केलाय. श्रीमती सोमैया आणि त्यांच्या कुटुंबीयांनी युवक प्रतिष्ठानच्या ( Yuvak Pratisthan ) माध्यमातून १०० कोटीचा घोटाळा केल्याचा आरोप राऊत यांनी केला होता.

संजय राऊत यांनी यासंदर्भात नगरविकास विभागाकडे तक्रार केली असल्याचे सांगितले. मात्र, या तक्रारींवरूनच आता किरीट सोमैया यांनी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भुषण गगराणी ( Bhushan Gagrani ) यांना पत्र लिहिलंय.

प्रधान सचिव भुषण गगराणी यांना लिहिलेल्या पत्रात सोमैया यांनी 'ज्या पद्धतीने गेले काही महिने राजकीय हेतूने कुप्रचार/अपप्रचार सुरु आहे त्याची आम्ही गंभीर दाखल घेत आहोत.' असे म्हटलंय.  

तसेच सोमैया यांनी '१०० कोटींचा घोटाळा' प्रा. मेधा सोमैया यांच्या व्यक्तिमत्वाला बदनाम करण्याचे काही शिवसेना नेते प्रयत्न करत आहेत. त्यात अधिकाऱ्यांनी आपला दुरुपयोग होऊ देऊ नये हि प्रार्थना' असेही लिहिले आहे. 

पत्राच्या अखेरीस सोमैया यांनी 'राजकिय हेतून शौचालय घोटाळ्याचा आरोप केला जात आहे, काही झालं तरी या संबंधीत कोणतही पाऊल ऊचलण्यापुर्वी आमच्याशी संपर्क करावा, विचारणा करावी. आम्ही माहिती द्यायला तयार आहोत असं म्हटलंय.

पहा सोमैया यांच पत्र...