'एका बाईसाठी पंडित नेहरूंनी देशाची फाळणी केली...' रणजीत सावरकरांचा खळबळजनक आरोप...

पंडित नेहरुंनी (Pandit Nehru) देशाचा विश्वासघात केला, एका बाईसाठी देशाची फाळणी (Partition) केल्याचा खळबळजनक आरोप

Updated: Nov 18, 2022, 08:31 PM IST
'एका बाईसाठी पंडित नेहरूंनी देशाची फाळणी केली...' रणजीत सावरकरांचा खळबळजनक आरोप...  title=

Ranjit Savarkar On Nehru : राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि सावकरांचा (Vinayak Damodar Savarkar) वाद अजूनही थांबायला तयार नाही. कारण आता सावरकरांचे नातू रणजीत सावकरांच्या (Ranjit Savarkar) विधानामुळे हा वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे. एका बाईसाठी नेहरूंनी (Jawaharlal Nehru) देशाची फाळणी (Partition) केल्याचा खळबळजनक आरोप रणजीत सावरकरांनी नेहरूंवर केलाय. लेडी माऊंटबॅटनसाठी (Lady Mountbatten) नेहरूंनी भारताचा विश्वासघात केल्याचाही आरोप त्यांनी केला. भारत स्वतंत्र झाल्यानंतर तब्बल 12 वर्षे नेहरूंनी लेडी माऊंटबॅटनच्या सांगण्यावरून देशाची गुप्त माहिती ब्रिटीशांना (British) पुरवल्याचा दावाही रणजीत सावरकर यांनी केला आहे.

'नेहरुंनी देशाचा विश्वासघात केला'
नेहरु-एडविना (Edwina Mountbatten) पत्रव्यवहार केंद्र सरकारने (Central Government) ब्रिटीशांकडे मागावं आणि ते जनतेसमोर जाहीर करावं, तेव्हा जनतेला कळेल की ज्यांना आपण चाचा नेहरु म्हणतो, त्या नेत्याने देशाची कशी फसवणूक केली, आणि देशाचा कसा विश्वासघात केला हे समोर येईल असा आरोपही रणजीत सावरकर यांनी केला आहे. नेहरूंनी 12 वर्षे ब्रिटिश अधिकाऱ्याचा पत्नीला रोज स्वतः दिवसभर ते काय करतात याची डायरी पाठवली. हा देशद्रोह नाही का ? असा सवालही रणजीत सावरकर यांनी उपस्थित केला.

महात्मा गांधींचं ते पत्र
राहुल गांधींनी जे पत्र दाखवलं त्यातला जर अर्थ त्यांनी लावला असेल तर गांधीजी (Mahatma Gandhi) यांनीही तसच एक पत्र लिहिलं होत.  गांधीजींच्या पत्रात लिहिलेल्या वाक्यांचा अर्थ असा घ्यायचा का की 'मैं आपका आज्ञाधारक नोकर बनना चाहता हु' असा सवालही रणजीत सावरकर यांनी विचारला आहे.  कायद्याने हक्क मागण वाईट नाहीये. सावरकर यांची जी मागणी होती त्यात त्यांनी बाहेर सोडण्यासाठी कायद्याने मागणी केली होती. सामान्य बंदी असतील तर त्यांना 6 महिन्यात बाहेर सोडलं जायचं. त्यांना सोडण्यात आल न्हवत म्हणून त्यांनी कायद्यनुसार अर्ज केला होता, अशी माहिती रणजीत सावरकर यांनी दिली.

'गांधींनी आंदोलन मागे घेतलं'
1920 साली सावरकर अंदमानमध्ये (Andaman) खितपत होते. 1921 साली त्यांना देशात आणलं त्यांना रत्नागिरीच्या (Ratnagiri) कोठडीत ठेवलं,  सावरकर यांनी हिंदुत्व लिहिलं याचं दुःख यांना आहे असा आरोपही त्यांनी केला. आंदोलन ऐन भरात आले आणि गांधीजीनी आंदोलन मागे घेतलं. 1921 ला जेव्हा आंदोलन सुरू झाले तेव्हा जालियनवाला बाग हत्याकांड (Jallianwala Bagh massacre) झालं.  देशभर उठाव झाला त्यानंतर 15 एप्रिलला गांधी पत्र लिहितात. जालियनवाला बागमधील हुतात्माना मी वीर म्हणणार नाही असे गांधीजी म्हणाल्याचं रणजीत सावरकर यांनी सांगितलं.

'गांधीजींनी देशभक्तांचा अपमान केला'
ऐन चळवळीच्या भरात गांधीजीनी देशभक्ताचा अपमान केला. 1931 ची चळवळ मागे घेतली तो शरणागतीचा करार होता. तो करार त्यांना करायचा होता तर त्यांनी आधी का नाही केला? तेव्हाच केला असता तर भगतसिंग यांचे प्राण वाचले असते पण त्यांना भगतसिंग यांचे प्राण वाचवायचे नव्हते, याला देशद्रोह नाही का म्हणणार नाही? असा सवालही रणजीत सावरकर यांनी विचारला आहे.