"भारत जोडो सुरक्षित राज्याबाहेर पाठवू पण...", राहुल गांधींना गृहमंत्री फडणवीसांनी ठणकावलं!

राहुल गांधींवर कारवाई करणार का? गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं!

Updated: Nov 18, 2022, 07:07 PM IST
 "भारत जोडो सुरक्षित राज्याबाहेर पाठवू पण...", राहुल गांधींना गृहमंत्री फडणवीसांनी ठणकावलं!  title=

Devendra Fadnavis On Rahul Gandhi : काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर याचे राज्यभर पडसाद उमटताना दिसत आहे. भाजपसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही यावरून काँग्रेसवर निशाणा साधला होता. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांना इशारा दिला आहे. 

राहुल गांधी जे काही करत आहेत त्यांनी ते कायद्याच्या चौकटीमध्ये राहून केलं तर ठीक. त्यांनी कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जावून काही केलं तर आम्हाला कारवाई करावी लागेल. यात्रा चालू आहे त्याला आम्ही सुरक्षा दिली असून ती यात्रा आम्ही सुरक्षितपणे राज्याच्या बाहेर काढू पण त्यांनी महाराष्ट्राचं वातावरण बिघडू नये, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी सूचक असा इशारा दिला आहे. 

राहुल गांधी यांच्या यात्रेला सुरूवातीला प्रसिद्धी मिळत नव्हती. मीडियानेसुद्धा या यात्रेला प्रसिद्धी दिली नाही म्हणून ते वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. ज्यांनी 11-14 वर्षे काळापाणी आणि तुरूंगवासाची शिक्षा भोगली त्यांच्याविषयी ज्यांनी कधी जेलची पायरी पाहिली नाही त्या लोकांनी बोलावं हे अत्यंत दुर्देवी आहे. म्हणून राहुल गांधींविषयी लोकांना राग असल्याचं फडणवीस म्हणाले.  

दरम्यान, राहुल गांधी महाराष्ट्रात येऊन काहीतरी बोलतात आणि ते गेल्यावर मागून त्यांच्याबाबत बोलतात. बाकी सत्तेसाठी ते सावकरांसोबतच आहेत आणि ते सावरकरांसाठी कधीच सत्ता सोडू शकत नाहीत, असं म्हणत फडणवीसांनी राऊतांवर निशाणा साधला.  राहुल गांधी यांनीही शेगावमधील सभेत सावकरांविषयी बोलणं टाळलं.